आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा चित्रपट:'भ्रम' या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात अभिजित साकारणार मुख्य भूमिका,  24 तासांत घडणाऱ्या घटनांच्या भोवती फिरणार कथानक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सकारात्मक विचारशैलीने जगणाऱ्या एका मुलाची भूमिका तो साकारताना दिसणार आहे.

'टकाटक', 'एक सांगायचय' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या अभिनेता अभिजित आमकरने कायमच प्रेक्षकांच्या मनात घर केले. वेगवेगळ्या फोटोशूटमुळे आणि म्युझिक अल्बममधून तो प्रेक्षकांच्या भेटीस येत राहिला. आता लवकरच अभिजित एका नव्या कोऱ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. 'भ्रम' असे चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रिलर असणार आहे.

चित्रपटाची कथा ही 24 तासांत घडणाऱ्या घटनांच्या भोवती फिरणारी आहे. क्राईम थ्रिलर असा विषय घेऊन अभिजित या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात अभिजित श्रीमंत वडिलाच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. परिस्थितीनुसार सामोरा जाणाऱ्या किंवा सकारात्मक विचारशैलीने जगणाऱ्या एका मुलाची भूमिका तो साकारताना दिसणार आहे.

या चित्रपटाबाबत बोलताना अभिजित म्हणाला, 'तरुण कलाकारांनी एकत्र येऊन एका वेगळ्याच ऊर्जेने ही 'भ्रम' फिल्म चित्रित करण्यात आली. चित्रीकरणादरम्यान असलेल्या सीन आणि विशेष लोकेशनमुळे खूप मज्जा आली. या चित्रपटाचे चित्रीकरण पिबीए फिल्मसिटीमध्ये करण्यात आले आहे. आम्ही सर्वच कलाकारांनी एकत्र येऊन धम्माल करत या फिल्मसाठी काम केले. भ्रमात टाकणाऱ्या अशा आगळ्या वेगळ्या आणि रोजच्या जीवनाशी वेगळा असा विषय घेऊन घेत भ्रम हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच घेऊन येऊ.'

अभिजितसह या चित्रपटात इलाक्षी गुप्ता, किरणदीप कौर, सिद्धेश्वर झाडबुके, भूषण मंजुळे, शिवराज वाळवेकर यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक वैभव लोंढे यांनी केले असून चित्रपटाच्या निर्मितीची धुरा अँजेला आणि तेजस भालेराव यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट 'पिबीए फिल्म्स' या बॅनर अंतर्गत प्रदर्शित करण्यात येणार आहे. तर या सस्पेन्स थ्रिलरचा नयनरम्य असा कॅनव्हास राकेश भिल्लारे यांनी चितारला आहे. तर चित्रपटाची कथा राम खाटमोडे लिखित आहे.

बातम्या आणखी आहेत...