आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सुंदरा मनामध्ये भरली'चा लेटेस्ट ट्रॅक:अभिमन्यू - लतिकाला मिळणार एकमेकांची खंबीर साथ! ठरणार ही दोघांच्या नात्याची नवी सुरुवात

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही अभिमन्यु आणि लतिकाच्या नात्याची नवी सुरुवात तर नाहीना?

छोट्या पडद्यावरील 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत अभिमन्यू आणि लतिकाचे वेगळे नाते बघायला मिळत आहे. त्यांच्यात कितीही मतभेद असले तरीदेखील संकटामध्ये ते एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. मग ते अभिचे स्वप्न पूर्ण करायचे असो वा दौलतच्या विरुध्द उभे राहायचे असो वा सज्जन कामिनीपासून पाठ सोडवणे असो... अभिला त्याचे स्वप्न पूर्ण करता यावे यासाठी लतिकाने त्याची खूप साथ दिली. सगळ्या झाल्या गेल्या प्रकरणामुळे अभिमन्यूच्या मनामध्ये कुठेतरी लतिकाबद्दल आदर आणि आपुलकी निर्माण झाली आहे.

‘आपल्यात कितीही भांडण असले तरीदेखील तुझे स्वप्न करण्यात मी तुझी साथ नक्कीच देणार’ असे लतिकाने अभिला सांगितले आहे. अभिमन्यूला लतिकाचा खंबीर आधार मिळाला आहे आणि येत्या महारविवारमध्ये लतिकाला मिळणार आहे अभिची साथ. असे नक्की काय घडणार आहे? ते आपल्याला 10 तारखेला कळेलच. एकमेकांच्या साथीने हे दोघे कशी करतील सारी स्वप्न साकार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

मालिकेचे 100 भाग पूर्ण

प्रेक्षकांच्या मिळणार्‍या उदंड प्रतिसादामुळे या मालिकेने नुकतेच 100 भाग पूर्ण केले. मालिकेतील पात्र, अभिमन्यू आणि लतिका यांची जोडी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अभीची आई म्हणजेच अतिशा नाईक, अभिची वाहिनी तसेच कामिनी, सज्जनराव यांची भूमिका देखील प्रेक्षकांची मने जिंकत आहे. सध्या मालिकेमध्ये शर्यतीचा मुद्दा सुरू आहे, ज्यात दौलतने अभिमन्यूला भाग घेण्याचे आव्हान दिले आहे. पण, अभीचे वडील याच्या पुर्णपणे विरोधात आहेत. अभिमन्यू लतिकाच्या साथीने कसा वडिलांचा होकार मिळवणार ? आणि तो शर्यतीत भाग घेणार का ? हे लवकरच प्रेक्षकांना समजेल.

बातम्या आणखी आहेत...