आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स 2020:अभिनय बेर्डे आणि मयुरेश पेम देणार लक्ष्मीकांत बेर्डे व दादा कोंडके यांना मानवंदना

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या दोघांनी मिळून लक्ष्मीकांत बेर्डे व दादा कोंडके यांच्या सदाबहार गाण्यांवर ताल धरला.

मराठी सिनेसृष्टी आणि विनोदी सिनेमा हा विषय दोन दिग्गजांच्या नावाशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. विनोदाचे बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे आणि द्व्यर्थी विनोदाचा सम्राट दादा कोंडके यांनी महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि एक काळ गाजवला. या दोन महान विनोदवीरांना मानवंदना देण्यासाठी झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स 2020 मध्ये नवोदित अभिनेते अभिनय बेर्डे आणि मयुरेश पेम सज्ज झाले.

यावर्षी झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सचं स्वरूप थोडं वेगळं आहे. यावर्षी झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स सोहळ्यात नॉमिनीज आणि पाहुणे हे वर्च्युअली एकमेकांशी जोडले गेले होते. या सोहळ्याचं आकर्षण म्हणजे अभिनय बेर्डे आणि मयुरेश पेम यांचा हा धमाकेदार परफॉर्मन्स. या खास परफॉर्मसाठी मयुरेश पेमने दादा कोंडके यांची वेशभूषा केली होती तर लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सुपुत्र अभिनय बेर्डे याने लक्ष्याची वेशभूषा केली. या दोघांनी मिळून त्यांच्या सदाबहार गाण्यांवर ताल धरला. प्रेक्षक देखील त्यांचा हा परफॉर्मन्स पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

त्यांच्या या परफॉर्मन्सबद्दल बोलताना अभिनय म्हणाला, "बाबांचा वाढदिवस नुकताच होऊन गेला आणि त्यांना मानवंदना देण्याची संधी मला झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सने दिली याचा मला आनंद आहे. त्यांची सगळीच गाणी हि खूप लोकप्रिय आहेत, त्यातील काही निवडक गाण्यांवर आपल्या स्टाईल परफॉर्म करताना मला खूपच मजा आली. नवीन पोपट हा आणि अशी हि बनवा बनवी या गाण्यांवर मी परफॉर्म केलं. झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्समध्ये सर्व नियमांचं पालन करून चित्रीकरण करण्यात आलं. हा अनुभव वेगळा आणि खूप चांगला होता."