आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेश मांजरेकरांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’:अक्षय कुमार छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत, म्हणाला - राज ठाकरेंमुळे स्वीकारली भूमिका

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नुकतीच त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही मोठी घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे या चित्रपटातून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. अक्षय कुमारच्या चित्रपटातील फर्स्ट लूकची झलकही या सोहळ्यात दाखवण्यात आली.

राज ठाकरेंमुळे अक्षयने स्वीकारली भूमिका
अक्षय कुमारने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका स्वीकारण्यामागील कारणही सांगितले आहे. राज ठाकरेंमुळे ही भूमिका स्वीकारल्याचे अक्षयने सांगितल आहे. "मला ही भूमिका राज ठाकरेंमुळे मिळाली. तू ही भूमिका करायला हवी, असे मला राज ठाकरे म्हणाले. छत्रपती महाराजांची भूमिका साकारणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या भूमिकेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. सगळी शक्ती मी यासाठी खर्च करेन," असे अक्षय कुमार म्हणाला.

बघा कलाकारांचा फर्स्ट लूक...

या चित्रपटात प्रवीण तरडे प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारणार आहेत.
या चित्रपटात प्रवीण तरडे प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारणार आहेत.
उत्कर्ष शिंदे सूर्याजी दांडकर यांची भूमिकेत आहे.
उत्कर्ष शिंदे सूर्याजी दांडकर यांची भूमिकेत आहे.
सत्य मांजरेकर दत्ताजी पागे यांची भूमिका वठवणार आहे.
सत्य मांजरेकर दत्ताजी पागे यांची भूमिका वठवणार आहे.
जय दुधाणे तुळजा जामकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
जय दुधाणे तुळजा जामकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
हार्दिक जोशी मल्हारी लोखंडे यांची भूमिका वठवतोय.
हार्दिक जोशी मल्हारी लोखंडे यांची भूमिका वठवतोय.
विशाल निकम चंद्राजी कोठार यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
विशाल निकम चंद्राजी कोठार यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
विराट मडके जिवाजी पाटलांच्या भूमिकेत दिसणार आहे.
विराट मडके जिवाजी पाटलांच्या भूमिकेत दिसणार आहे.

महेश मांजरेकर दिग्दर्शित हा बहुचर्चित चित्रपट 2023 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...