आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाच्या विळख्यात कलाकार:अभिनेते अशोक शिंदे यांना कोरोनाचा संसर्ग, सोशल मीडियावरुन स्वतः दिली माहिती

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशोक शिंदे सध्या क्वारंटाइनमध्ये आहेत.

देशात आलेल्या कोरोनाच्या दुस-या लाटेत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांत मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मातदेखील केली.आता अभिनेते अशोक शिंदे यांना कोरोना संसर्ग झाला आहे.

अशोक शिंदे यांनी स्वतः बुधवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. ‘मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो, सर्व प्रकारची काळजी घेतल्यानंतरही माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खबरदारी म्हणून मी स्वत:ला क्वारंटाइन केले आहे आणि माझे औषधोपचार सुरु केले आहेत,’ असे ते म्हणाले आहेत.

‘मी सर्वांना विनंती करतो, गेल्या 15 दिवसात जे माझ्या संपर्कात आले त्यांनी कृपया स्वत:ची चाचणी करुन घ्या. काळजी घ्या सुरक्षित रहा,’ असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.

अशोक शिंदे सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'स्वाभिमान शोध अस्तित्वाचा' या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहेत.

बातम्या आणखी आहेत...