आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवाकोरा कार्यक्रम:शेजारधर्माचा सन्मान करणारा 'सख्खे शेजारी' कार्यक्रम लवकरच... अभिनेता चिन्मय उदगीरकर सांभाळणार सूत्रसंचालनाची धुरा

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 11 जानेवारीपासून सोम – शनि संध्या 6.30 वा. हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एक हक्काचं घरं, आधाराचा हात आणि एक हाक देताच मदतीला धावून येणारा शेजारी लाभण म्हणजे भाग्यच. असं म्हणतात, ‘कोसो दूर असलेल्या नातेवाईंकापेक्षा हाकेच्या अंतरावर असलेला शेजारी अधिक जवळचा’. अडीअडचणीच्या काळात आपल्याला पहिल्याप्रथम आठवतो तो शेजारीच... सुखाच्या क्षणी ते आपल्यासोबत कायम असतात, दु:खात खंबीरपणे आपली साथ देतात आणि म्हणूनच हे शेजारी आपल्याला आपले सख्खे वाटतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात नात्यांमध्ये दुरावा येत चालला आहे, रक्ताची माणसं भेटत नाही, पण हक्काचा शेजारी लगेच धावून येतो. नातेवाईक सणासुदीला येतात पण रोज संबंध येतो तो शेजार्‍यांशी म्हणूनच त्यांच्याशी एक जवळचं, आपुलकीचं नातं तयार होतं. काही शेजा-यांशी आपले घरचे ऋणानुबंध जोडले जातात आणि म्हणूनच आपण त्यांना ‘सख्खे शेजारी' म्हणतो. अशाच आपल्या जवळच्या शेजारी कुटुंबांसोबत रंगणार आहेत लय भारी गप्पा, जेव्हा घरी येणार ‘सख्खे शेजारी’… रक्ताचं नातं नसलं तरी एक ‘हक्काचं’, 'माणूसकी'चं नातं चिरंतन टिकवून ठेवणाऱ्या शेजारधर्माचा सन्मान करणारा शेजारोत्सव म्हणजेच हा कार्यक्रम.

आपण आपल्या जीवाभावाच्या शेजार्‍याला किती ओळखतो, त्यांच्याबद्दल किती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी आणि याच शेजार्‍यांसोबत असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उत्सव साजरा करण्यासाठी कलर्स मराठी टेलिव्हिनजनवर पहिल्यांदाच घेऊन येत आहे एक धम्माल शो ‘सख्खे शेजारी’. 11 जानेवारीपासून सोम – शनि संध्या 6.30 वा. हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून अभिनेता चिन्मय उदगीरकर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. कार्यक्रमाची निर्मिती OMG ऑफबीट मीडिया गाईड ही संस्था करणार आहे.

आजपर्यंत आपण कुटुंबातील सदस्यांना, गृहलक्ष्मींना, त्यांच्या नवर्‍यांना इच्छापूर्तीसाठी खेळताना बघितलं. पण, दोन सख्खे शेजारीच एकमेकांसोबत खेळताना कधीच पहिले नाही. आता पहिल्यांदाच धम्माल उडवून देणार आहेत, अनेक वर्षांपासून एकमेकांच्या सुख दु:खाचे वाटेकरी दोन “सख्खे शेजारी” ! अनेक वर्षे एकमेकांच्या सान्निध्यात राहिलेली, एकमेकांशी ऋणानुबंध असलेली, सांसारिक वाटचालीत साक्षीदार असलेली, आजूबाजूला किंवा एकाच सोसायटीत राहणारी दोन कुटुंबं या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमामध्ये येणार्‍या दोन सख्ख्या शेजार्‍यांमधील नातं किती घट्ट आहे हे अनुभवण्यासाठी काही गमंतीदार, धम्माल असे गेम, टास्क सादर होतील. जे कुटुंब त्यांच्या शेजार्‍यांविषयी अचूक माहिती सांगतील ते ठरणार आहेत त्या भागाचे विजेते. कार्यक्रमामध्ये विजेत्या कुटुंबाला मिळणार आहे 50 गृहउपयोगी गोष्टी, डिझायनर नेमप्लेट याचसोबत सहभागी कुटुंबियांना गेममध्ये रोख रक्कम जिंकण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की, चिन्मय उदगीकर या कार्यक्रमामध्ये येणार्‍या कुटुंबासोबत हितगुज करणार आहे, त्यांच्याबद्दलच्या काही मजेशीर गोष्टी जाणून घेणार आहे.

कार्यक्रमाविषयी बोलताना चिन्मय उदगीरकर म्हणाला, “बऱ्याच वर्षांपासून काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. ‘सख्खे शेजारी’ सारखा वेगळा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली मी खूप आनंदी आहे. मी आजवर प्रेक्षकांना वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटलो. आजवर प्रेक्षकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं आता कलर्स मराठीवरील या कार्यक्रमाद्वारे मी रसिक प्रेक्षकांना एका नव्या भूमिकेमध्ये भेटायला येणार आहे, जे माझ्यासाठी एक प्रकारचं आव्हानच आहे. या कार्यक्रमाद्वारे मला त्यांच्या कुटुंबाचा भाग होऊन सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली आहे हे माझ्यासाठी खूप खास आहे. इतकंच नसून यानिमित्ताने कलर्स मराठी कुटुंबाचा भाग होऊन मी कलर्स मराठीला लोकांच्या घरात घेऊन जाणार आहे, आणि कुटुंब मोठं करणार आहे. खरंतर मी खूप ऊत्सुकदेखील आहे.”

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser