आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉक्टर डॉन या झी युवावरच्या मालिकेमुळे अभिनेता देवदत्त नागे एका मोठ्या अवधीनंतर पुन्हा टीव्हीच्या छोटया पडद्यावर दिसू लागलाय. जय मल्हार या मालिकेच्या घवघवीत यशानंतर देवदत्त प्रेक्षकांच्या घराघरातच नाही तर अनेकांच्या देव्हाऱ्यापर्यंतही पोहोचला, या मालिकेमध्ये देवदत्त मल्हारी मार्तंडची महत्वाची व्यक्तिरेखा साकारत होता आणि आता डॉक्टर डॉन या मालिकेमध्ये देवदत्त देवा या डॉनची भूमिका साकारतोय. या मालिकेतून पहायला मिळणारी देवा आणि डॉ मोनिका यांची खट्टी मिठी नोक झोक सध्या प्रेक्षकांना चांगलीच भावतेय.
प्रत्यक्ष आयुष्यात मात्र आपल्या देवदत्तची एक लांबलचक प्रेमकहाणी सुरु आहे. नाही, नाही त्याच्या बायकोसोबतच नाही तर ही प्रेमकहाणी आहे त्याच्या बाईकसोबतची. देवदत्त प्रत्यक्ष आयुष्यात बाईक्स साठी क्रेझी आहे वेगवेगळ्या प्रकारच्या बाईक्स चालवायच्या इतकंच नाही तर बाईक्सचे नवनवे मॉडेल्स शोधायचे या सगळ्या गोष्टी देवदत्त उत्साहाने करत असतो आणि यासंदर्भातली सगळी माहिती तो त्याच्या चाहत्यांना त्याच्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन देतही असतो.
नुकतंच देवदत्तनं बाईकच्या या प्रेमापोटी त्याला अचानक मिळालेल्या अनोख्या टॅटूबद्दलची अपडेट सोशल मीडियावर दिली. विशेष म्हणजे हा टॅटू देवदत्तने कुठल्याही प्रोफेशनल टॅटू डिझायनरकडून नव्हता काढला तर बाईक चालवताना रस्त्यावरचा चिखल त्याच्या टीशर्टमागे अनावधानाने उडाला आणि तो असा काही छापला गेला जणू काही ती टॅटूची नवी डिझाईनच.
देवदत्तनेही अत्यंत खुल्या मनाने या टीशर्ट मागच्या टॅटूचं स्वागत केलं आणि निसर्गाच्या या क्रिएटिव्हीटीला सलामही ठोकला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.