आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फर्स्ट लूक:'सरसेनापती हंबीरराव'मध्ये अभिनेता गश्मीर महाजनी पेलणार शिवरायांच्या भूमिकेचं शिवधनुष्य, शेअर केला चित्रपटातील लूक

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रवीण तरडे या चित्रपटात हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारत आहेत.

प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित 'सरसेनापती हंबीरराव' हा भव्य ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा मान मिळविणारे 'हंबीरराव मोहिते' यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.

आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या चित्रपटात शिवरायांच्या भूमिकेच शिवधनुष्य कोणता अभिनेता पेलणार, याचा उलगडा झाला आहे. अभिनेता गश्मीर महाजनी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

गश्मीरने सोशल मीडियावर चित्रपटातील फर्स्ट लूक पोस्टर शेअर केला आहे. ''सरसेनापती हंबिरराव या चित्रपटातील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत माझा First Look. यशवन्त कीर्तिवन्त । सामर्थ्यवंत वरदवन्त । नीतिवन्त पुण्यवंत । जाणता राजा॥,'' असे कॅप्शन त्याने दिले आहे.

या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत स्वराज्याचे सेनापती म्हणून शौर्य गाजविलेल्या सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची गाथा पाहायला मिळणार आहे. स्वतः तरडे यात हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारत आहेत.

या चित्रपटाची निर्मिती शिवनेरी फाउंडेशन करत असून संदिप रघुनाथराव मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडेचे असणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...