आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोविंदा स्पेशल एपिसोड:अभिनेता गोविंदा 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या मंचावर, स्पर्धकांसह धरला 'हिरो नंबर 1'ने ताल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोविंदाच्या येण्याने स्पर्धक आणि गुरू यांच्यातला उत्साह वाढला आहे.

'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' हा कार्यक्रम थोड्याच काळात प्रेक्षकांचा आवडता झाला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेली नृत्यातली प्रतिभा प्रेक्षकांना या मंचावर पाहायला मिळत आहे. येत्या आठवड्यात 21 आणि 22 डिसेंबरला 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'मध्ये हिरो नंबर वन गोविंदा उपस्थित असणार आहे.

गोविंदाच्या येण्याने स्पर्धक आणि गुरू यांच्यातला उत्साह वाढला आहे. या आठवड्यात होणारी सगळी सादरीकरण गोविंदाला समर्पित असणार आहेत. गोविंदासाठी खास ट्रिब्यूटही सर्व स्पर्धक आणि त्यांचे गुरू यांनी सादर केलेले पाहायला मिळणार आहे.

गोविंदाच्या गाण्यांवर आणि गोविंदाच्या स्टेप्स वापरून केलेली नृत्यं पाहून गोविंदाही भारावून गेला. एवढंच नाही तर मंचावर येऊन त्यानी स्पर्धकांबरोबर नृत्यही केलं. गोविंदाच्या आयकॉनिक स्टेप्स नृत्याच्या महामंचावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

धर्मेश सर स्वतः गोविंदाचे चाहते असल्याने गोविंदाच्या उपस्थितीनं तेही भारावून गेले होते. स्पर्धकांमधील आर्य डोंगरे याच्या आजोबांनी जमवलेल्या गोविंदाच्या आईच्या आवाजातली दुर्मिळ चित्रफीतही 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' टीमकडून भेट म्हणून देण्यात आली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser