आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणीत मराठी अभिनेता:राजकीय भूमिका घेतल्याने अभिनेते किरण माने यांना ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून काढले, प्रेक्षक संताप व्यक्त करत म्हणाले - हा सांस्कृतिक दहशतवाद

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्टार प्रवाह वाहिनीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेत विलास पाटील हे पात्र साकारणारे अभिनेते किरण माने राजकीय भूमिका घेतल्याने अडचणी साडपले आहेत. त्यांना राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. किरण माने हे सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमुळे चर्चेत असतात. आपल्या पोस्टमधून ते अनेकदा राजकीय भूमिका मांडताना दिसतात. पण आता याच कारणाने ते अडचणीत आले आहेत.

एका मुलाखतीमध्ये किरण माने यांनीच यासंदर्भात खुलासा केला असून राजकीय भूमिकेमुळे आपल्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, 'होय, मला मालिकेतून काढून टाकले आहे. मला तासाभरापूर्वीच चॅनेलने ही माहिती दिली.' किरण माने यांनी गुरुवारी सायंकाळी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. “काँट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड दो बीज हूँ मैं, पेड बन ही जाऊंगा!,” असा मजकूर या पोस्टमध्ये आहे.

सोशल मीडियावर किरण मानेंविरोधात वाहिनीने केलेल्या कारवाईवरुन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अनेक चाहत्यांनी उघडपणे किरण मानेंना या प्रकरणामध्ये पाठिंबा दर्शवला असून या कारवाईला सांस्कृतिक दहशतवाद असे म्हटले आहे. किरण माने यांच्या अनेक चाहत्यांनी आयस्टँड व्हिथ किरण माने असा हॅशटॅग वापरून किरण माने यांना पाठिंबा दर्शवला आहे. तरुणाईमध्ये लोकप्रिय असणारा खास रे या फेसबुक पेजवर लिहिण्यात आले आहे, 'राजकीय भूमिका घेतल्याने आपल्या सर्वांचे लाडके किरण माने सरांना यांना स्टार प्रवाहाने मालिकेतून काढून टाकले आहे. हा सांस्कृतिक दहशतवाद नाही का..?, जो माणूस वास्तव आणि न्यायाच्या बाजूने उभा राहतोय, जो माणूस तुमच्या आमच्या हक्कासाठी इथ उघडपणे व्यक्त होतोय, ज्यावेळी गरज असते त्यावेळी इतर कलाकार गप्प बसलेले असताना हा माणूस तुमचा माझा आवाज बनून आपली लेखणी आपल्यासाठी झिजवतो आहे…त्या माणसासाठी आता आपण सर्वांनी उभे राहायची गरज आहे,' असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्टार प्रवाह वाहिनीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

यावर वाहिनी आणि मालिका काय प्रतिक्रिया देते याची वाट नेटकरी बघत आहेत.

बातम्या आणखी आहेत...