आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय भूमिका घेतल्याने वादंग:अभिनेते किरण माने यांना 'मुलगी झाली हो' मालिकेतून काढले; काँग्रेस नेते सचिन सावंत आणि जितेंद्र आव्हाड संतापले, म्हणाले...

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेस नेते सचिन सावंत आणि जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या 'मुलगी झाली हो' या मालिकेत अभिनेते किरण माने हे विलास पाटील ही भूमिका साकारत होते. त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली. पण आता त्यांना या मालिकेतून काढण्यात आले आहे. किरण यांचा आरोप आहे की, राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे.

एका मुलाखतीमध्ये किरण यांनी सांगितले की, माझ्या राजकीय भूमिकेमुळे मला मुलगी झाली हो या मालिकेतून काढण्यात आले आहे. त्यानंतर किरण यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, ' काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा... गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा !' किरण माने यांच्या अनेक चाहत्यांनी आयस्टँड व्हिथ किरण माने असा हॅशटॅग वापरून किरण माने यांना पाठिंबा दर्शवला आहे. यासह आता काँग्रेस नेते सचिन सावंत आणि जितेंद्र आव्हाड यांनीदेखील या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट शेअर करत या गोष्टीचा निषेध केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले, 'किरण माने या गुणी कलाकाराने सद्य राजकीय परिस्थितीबद्दल मत व्यक्त केले ते भाजपाला सहन झाले नाही त्यामुळे दबाव आणून या कलाकाराला मालिकेतून काढले गेले. हा भाजपाचा सांस्कृतिक दहशतवाद आहे. भाजपा विरोधात बोलण्याची हिंमत कशी होते हा दंभ त्यामागे आहे. '

तर जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'स्टार प्रवाहावरील “मुलगी झाली हो” या मालिकेतील विलास पाटील पात्र साकारणा-या किरण माने या अभिनेत्यास फुले, शाहु, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मीडियावर लिहितो, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो म्हणुन अचानक मालिकेतूल काढुन टाकले गेले.'

सोशल मीडियावर देखील किरण मानेंविरोधात वाहिनीने केलेल्या कारवाईवरुन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अनेक चाहत्यांनी उघडपणे किरण मानेंना या प्रकरणामध्ये पाठिंबा दर्शवला असून या कारवाईला सांस्कृतिक दहशतवाद असे म्हटले आहे. किरण माने यांच्या अनेक चाहत्यांनी आयस्टँड व्हिथ किरण माने असा हॅशटॅग वापरून त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

बातम्या आणखी आहेत...