आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिळकांचा प्रवास मालिकारूपात:'धर्मवीर'मध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका वठवणारा 'हा' अभिनेता साकारणार 'लोकमान्य'

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

झी मराठी वाहिनीने नुकतीच दोन नव्या मालिकांची घोषणा केली. यापैकी एक मालिका लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित आहे. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच” अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांचा जाज्वल्य देशाभिमान या मालिकेत बघायला मिळणार आहे.

'लोकमान्य' या मालिकेत क्षितीश दाते बाळ गंधाधर टिळकांच्या मूख्य भूमिकेत दिसणार आहे. क्षितीशने 'धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारुन प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. आता तो एका ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. क्षितीशसोबत या मालिकेमध्ये अभिनेत्री स्पृहा जोशी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाचे घटना-प्रसंग या मालिकेत पहायला मिळणार आहेत. टिळकांचा विवाह, त्यांचे महाविद्यालयीन जीवन, त्यांचे विविधांगी लेखन, राजकीय स्तरावरील त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वपूर्ण टप्पे या मालिकेतून प्रेक्षकांना पहायला मिळतील. ते जहाल विचारांचे थोर भारतीय नेते होते. घड्याळ्याच्या काट्याला बांधून दिवसरात्र धावणाऱ्या, भूतकाळाचे ओझे भिरकावून देत काळासोबत चालणाऱ्या लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास अचंबित करणारा आहे. तो मालिकेतून पाहणं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ठरेल.

या मालिकेचं लेखन आशुतोष परांडकर यांनी केले असून स्वप्निल वारके हे दिग्दर्शक आहेत. दशमी क्रिएशन्स हे या मालिकेचे निर्मिते आहेत. ही मालिका 21डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता आपल्या भेटीस येत आहे.

बातम्या आणखी आहेत...