आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘संत गजानन शेगावीचे’:आता मनोज कोल्हटकर साकारणार गजानन महाराजांची भूमिका, काही वर्षांनी पुढे सरकले कथानक

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील 'संत गजानन शेगावीचे’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अभिनेता अमित फाटक या मालिकेत गजानन महाराजांच्या भूमिकेत झळकला. पण आता या मालिकेचे कथानक आता काही वर्षांनी पुढे सरकले आहे. अमित फाटकने गजानन महाराजांच्या तरुणपणाची भूमिका साकारली. आता कथानक पुढे सरकल्याने मालिकेत ही महत्त्वाची भूमिका अभिनेते मनोज कोल्हटकर साकारणार आहेत.

नुकताच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. मनोज कोल्हटकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा प्रोमो शेअर केला आहे. "भक्तांच्या सुखासाठी जो सदैव दक्ष त्या संताच्या कर्माची शेगाव देई साक्ष... लोटला काळ, सरले पक्ष... बहरला करुणेचा कल्पवृक्ष! पाहा महामालिका "संत गजानन शेगावीचे- ब्रेक फ्री'' 3 एप्रिल ते 8 एप्रिल रात्री 9 वाजता" असे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

काही दिवसांपूर्वीच अमितनेदेखील त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत त्याचा मालिकेचा प्रवास संपल्याचे सांगितले होते. त्याने प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभारदेखील मानले होते.

मनोज कोल्हटकर यांच्यासह अभिनेते गणेश यादव हे देखील ‘संत गजानन शेगावीचे' मालिकेतून एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे मनोज पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर भक्तिपर भूमिका साकारणार आहेत. मनोज यांना यापूर्वी प्रेक्षकांनी सांग तू आहेस का, सावित्रीज्योती, मेरा साई आणि होणार सून मी ह्या घरची या गाजलेल्या मालिकांमध्ये पाहिलंय.