आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा वाढता विळखा:अभिनेते मोहन जोशी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, गोव्यात करत होते चित्रीकरण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोना संसर्ग झाल्याचे वृत्त आहे.

देशात करोनाने थैमान घातले आहे. दर दिवसाला चार लाखांच्या घरात रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. कोरोना संसर्ग झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या विळख्यात सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण अडकले आहेत. आता मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोना संसर्ग झाल्याचे वृत्त आहे.

मोहन जोशी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली. महत्वाचे म्हणजे मोहन जोशी यांनी त्यांच्या कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यांनी त्यांच्या चाहत्यांना स्वतःची काळजी घेण्याचे सांगून घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

सध्या मोहन जोशी 'अग्गंबाई सुनबाई' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. महाराष्ट्रात लॉकडाऊन घोषित झाल्यावर मालिकेतील इतर कलाकारांसोबत ते देखील गोव्याला चित्रीकरणासाठी गेले होते. परंतु, गोव्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवाने सर्व मालिकांना दिलेली चित्रीकरणाची परवानगी रद्द केली. त्यानंतर संपूर्ण मालिकेची टीम मुंबईला परत आली होती. मागील वर्षी या मालिकेत महत्त्वाची भूमिका वठवणा-या अभिनेत्री निवेदिता सराफ यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

मोहन जोशी यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांसह तामिळ, तेलुगु, कन्नड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...