आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या पडद्यावरी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. या मालिकेतील नेहा आणि यशची जोडी आणि परीचा निरागस अभिनय प्रेक्षकांना भावला आहे. नुकतंच या मालिकेत नेहा आणि यशचा भव्य-दिव्य विवाह सोहळा पाहायला मिळाला. नेहा आणि यशाच्या लग्नामुळे चौधरी कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र आता लवकरच त्यांच्या आनंदात विरजण पडणार आहे. नेहा आणि यशच्या सुखात मिठाचा खडा टाकण्यासाठी एका नवीन व्यक्तिरेखेची मालिकेत एंट्री झाली आहे. ही व्यक्तिरेखा आहे नेहाच्या पहिल्या नवऱ्याची.
नुकतंच मालिकेत अविनाशची झलक पाहायला मिळाली. अविनाश त्याला परीसाठी ड्रायव्हर म्हणून अपॉईंट केलं असल्याचं सांगतो. अविनाश हा दुसरा तिसरा कोणी नसून नेहाचा पहिला नवरा आहे. त्यामुळे आता परी आणि नेहाच्या सुखी आयुष्यात अविनाश नावाचं वादळ येणार आहे तेव्हा त्यांची आयुष्य बदलणार की यश या वादळातून सगळ्यांना सुखरूप बाहेर काढणार हे पाहणं रंजक ठरेल.
अभिनेता निखिल राजेशिर्के साकारतोय अविनाश
अविनाशची भूमिका अभिनेता निखिल राजेशिर्के साकारतोय. या भूमिकेबद्दल बोलताना निखिल म्हणाला, "माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका अतिशय लोकप्रिय आहे आणि या मालिकेत एका रंजक वळणावर माझी महत्वपूर्ण भूमिकेत एंट्री झाली याचा मला खूप आनंद आहे. ही भूमिका आहे नेहाचा पहिला पती आणि परीचा बाबा अविनाशची. अविनाशला बघून नेहाची काय प्रतिक्रिया असेल आणि अविनाशचा नेहा आणि परीच्या आयुष्यात परत येण्याचा हेतू नक्की काय आहे हे प्रेक्षकांना पाहायला आवडेल."
ख-या आयुष्यात डॉक्टर आहे निखिल
अभिनेता निखिल राजेशिर्के हा ख-या आयुष्यात डॉक्टर आहे. त्याने मुंबईतून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तो अभिनयाच्या आवडीने अभिनय क्षेत्राकडे वळला. निखिल हा प्रेक्षकांसाठी ओळखीचा चेहरा आहे. अलीकडेच आपण त्याला मुक्ता बर्वे आणि उमेश कामत स्टारर अजूनही बरसात आहे या मालिकेत पाहिलंय. या मालिकेत त्याची ग्रे शेडची भूमिका होती. तर यापूर्वी तो 'आभाळमाया', 'अरुंधती' 'एक मोहोर अबोल', 'दिल्या घरी तू सुखी रहा', 'लगोरी', 'प्रीती परी तुजवरी', 'लक्ष' सारख्या मालिकेतही झळकला आहे. तसेच निखिलने 'तेंडुलकर आउट' या चित्रपटाचे सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. त्याने 'बायकर्स अड्डा', 'असेही एकदा व्हावे', '7 दोन 75', 'फक्त इच्छाशक्ती हवी' या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.