आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदाची बातमी:अभिनेता संकर्षण क-हाडे झाला जुळ्या मुलांचा बाबा, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितली मुलांची नावे

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 27 जून रोजी संकर्षणच्या जुळ्या मुलांचा जन्म झाला.

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याच्या घरी दोन नव्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. संकर्षण जुळ्या मुलांचा बाबा झाला आहे. संकर्षणची पत्नी शलाकाने गोंडस बाळांना जन्म दिला आहे. 27 जून रोजी शलाकाने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला. 1 ऑगस्ट रोजी संकर्षणने ही गोड बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सोबतच त्याने मुलांची नावे आणि त्यांच्या नावांचा अर्थ देखील सांगितला आहे.

संकर्षणने मुलाचे सर्वज्ञ ठेवले आहे तर मुलीचे नाव स्रग्वी असे ठेवले आहे. संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बाळासोबतचा फोटो शेअर केला आहे. बाळासोबतचा फोटो शेअर करत संकर्षणने लिहिले, ‘चि. सर्वज्ञ (SARVADNYA) संकर्षण कऱ्हाडे, कु. स्रग्वी (SRAGVI) संकर्षण कऱ्हाडे (सर्वज्ञ : सर्व जाणनारा, ज्ञानी .. ; स्रग्वी : पवित्रं तुळस..)’ असे कॅप्शन दिले आहे. संकर्षणच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी तसचे चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

संकर्षण आणि शलाका यांच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत.

संकर्षणने मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. तो अभिनयाचे बाळकडू घरातूनच मिळाले. त्याचे वडील परभणीला बँकेत अधिकारी होते. पण अभिनयाची आवड असल्याने ते नाटकातही काम करायचे. त्यांना पाहून मोठे होत गेलो आणि नकळत मीही या क्षेत्राकडे वळलो, असे संकर्षण सांगतो. वयाच्या सातव्या वर्षी त्याने पहिल्यांदा नाटकात छोटीशी भूमिका केली होती. त्यानंतर राज्य नाट्य स्पर्धा, पु. ल. करंडक आणि ‘फियर फॅक्टर’ या नाटकाने पहिले पारितोषिक मिळवून दिले. 2008 मध्ये महाराष्ट्राचा सुपरस्टार या झी मराठीच्या कार्यक्रमात त्याला संधी मिळाली. त्यानंतर ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना ’ आणि ‘आभास हा’ या मालिकांमध्ये तो झळकला. टीव्ही मालिकांसोबत ‘रामराम महाराष्ट्र’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून संकर्षण प्रेक्षकांच्या भेटीला आला. शिवाय ‘लोभ असावा’, ‘मी रेवती देशपांडे’ या व्यावसायिक नाटकांमध्ये त्याने काम केले आहे. 'तू म्हणशील तसं' हे त्याचे नाटकही रंगभूमीवर गाजले आहे.

बातम्या आणखी आहेत...