आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोटा पडदा:दोन वर्षांनंतर अभिनेता संकेत पाठकचं छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन, ‘लग्नाची बेडी’ मालिकेत साकारणार धडाकेबाज पोलिस ऑफिसर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 31 जानेवारीपासून दुपारी 1 वाजता भेटीला येतेय नवी मालिका ‘लग्नाची बेडी’.

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी ‘स्टार प्रवाह’ प्रेक्षकांसाठी नव्या वर्षात मनोरंजनाचा नवा ठेवा घेऊन आली आहे. 31 जानेवारीपासून दुपारी 1 वाजता भेटीला येतेय नवी मालिका ‘लग्नाची बेडी’. अभिनेता संकेत पाठक दोन वर्षांनंतर या मालिकेच्या निमित्ताने टेलिव्हिजनवर पुनरामगन करतोय. ‘लग्नाची बेडी’ मालेकत संकेत आयपीएस ऑफिसर राघव रत्नपारखी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. देशावर मनापासून प्रेम करणारा आणि गुन्हेगारीचा खात्मा करण्यासाठी जीवाची बाजी लावायलाही मागेपुढे न पाहाणारा असा हा आयपीएस ऑफिसर राघव रत्नपारखी.

संकेतसाठी ही मालिका नवं आव्हान असणार आहे. 'लग्नाची बेडी' या मालिकेतल्या व्यक्तिरेखेविषयी सांगताना संकेत म्हणाला, ‘राघव रत्नपारखी हा अतिशय प्रामाणिक आणि धाडसी आयपीएस ऑफिसर आहे. एकत्र कुटुंबात वाढलेला आणि नात्याचं महत्व जाणणारा. हे पात्र साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. नव्या वर्षाची सुरुवात एका चांगल्या प्रोजेक्टने होतेय याचा आनंद आहे. खाकी वर्दीची ताकद आपल्या सर्वांनाच माहित आहे. ती परिधान केल्यानंतर अंगात एक वेगळीची ऊर्जा संचारते. हे पात्र साकारताना एक अभिनेता म्हणून नवनव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत.

याधी संकेतच्या 'दुहेरी' आणि 'छत्रीवाली' या मालिकांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. त्यामुळे हे नवं पात्र आणि नवी मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची खात्री आहे, असे संकेत सांगतो.

बातम्या आणखी आहेत...