आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

लाव रे तो व्हिडिओ:अभिनेता सिद्धार्थ जाधवचं 'रंपाट' रॅप साँग पाहिलंत का तुम्ही! 

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिद्धार्थचा हा नवा पैलू लाव रे तो व्हिडिओ या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांसमोर आला.

'लाव रे तो व्हिडिओ' हा एक आगळावेगळा कार्यक्रम झी युवा वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आली आहे. या कार्यक्रमामुळे अनेकांना घरातूनच आपले कौशल्य सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळाले. या शोमध्ये कल्पित प्रतिभेला टेलीव्हिजनवर प्रदर्शित करण्याची संधी मिळते या संकल्पनेमुळे बरेच प्रसिद्धी आणि लक्ष वेधून घेत आहे. 'लाव रे तो व्हिडिओ'चा निवेदक निलेश साबळे  म्हणतो, "हे मोबाईलचे जग आहे आणि आम्ही मोबाईलला दूरदर्शनशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे." या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये सोनाली कुलकर्णीने निलेश साबळेला सेलिब्रिटी जज म्हणून मदत केली. तर नुकत्याच झालेल्या भागात सिद्धार्थ जाधव प्रेक्षकांच्या भेटीस आला.

सिद्धार्थ जाधव हे त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी आणि त्याच्या कमाल सेन्स ऑफ ह्युमरसाठी प्रसिद्ध आहे. त्याने अनेक, रहस्यमय, गंभीर आणि रोमँटिक नाटकांत काम केले आहे. पण सिद्धार्थ जाधव रॅप करू शकतात हे कोणाला ठाऊक होते? लाव रे तो व्हिडिओच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात सिद्धार्थ जाधवने 'रंपाट' या चित्रपटातील सादर केलं. इतकंच नव्हे तर उत्तम प्रकारे सादर केलेल्या रॅप सॉंगमुळे सिद्धार्थने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन देखील केले.

सिद्धार्थचा हा नवा पैलू या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांसमोर आला.