आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाच्या विळख्यात मराठी सेलिब्रिटी:अभिनेता सुबोध भावेला कोरोनाची लागण, घरीच केले स्वतःला क्वारंटाइन; पत्नी आणि थोरला मुलगाही संक्रमित

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुबोधने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करुन ही माहिती दिली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेचे घर कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. सुबोधसह त्याच्या पत्नी आणि मोठ्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. सुबोधने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करुन ही माहिती दिली आहे.

''मी, मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वतःला क्वरांटाइन करून घेतले आहे. तज्ज्ञ डॉ.च्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. गणपती बाप्पा मोरया'', अशी पोस्ट सुबोधने शेअर केली आहे.

  • रविवारी भारतात आढळले 80,078 नवे रुग्ण

भारतात कोरोना संसर्ग नव्या स्तरावर गेला आहे. शनिवारी 78,751 नवे रुग्ण समोर आले होते. ही कुठल्याही देशात एका दिवसात आढळलेल्या रुग्णांची आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. रविवारी सलग दुसऱ्या दिवशी देशात जगातील आतापर्यंतचे विक्रमी 80,078 नवे रुग्ण आढळले. याआधी अमेरिकेत 24 जुलैला जगात सर्वाधिक 78,586 रुग्ण आढळले. रविवारी सायंकाळपर्यंत विविध राज्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार देशात संक्रमितांची एकूण संख्या 36,12,164 झाली आहे. 958 नव्या मृत्यूंसह कोरोनामुळे आतापर्यंत देशात 64,536 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचा मृत्युदर 1.79% राहिला आहे. आतापर्यंत 27,65,540 रुग्ण बरे झाले आहेत. रिकव्हरी रेट 76.56% आहे. महाराष्ट्रात रविवारी 16,408 रुग्ण आढळले. तेथे चार दिवसांत 60 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. राज्यात एकूण संक्रमित 7.8 लाखांवर गेले आहेत. कोणत्याही देशाच्या कोणत्याही राज्यात ही रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात 7 लाख रुग्ण आहेत. रविवारी आंध्र प्रदेशात 10,603, कर्नाटकात 8,852, तामिळनाडूत 6,495, यूपीत 6,175 आणि दिल्लीत 2,024 नवे रुग्ण आढळले. देशात 24 तासांत प्रथमच विक्रमी 10.55 लाखांपेक्षा जास्त चाचण्या झाल्या.