आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत सुबोध भावे:अभिनेत्याने केली नवीन चित्रपटाची घोषणा, यंदा दिवाळीत पाच भाषांमध्ये येणार 'हर हर महादेव'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे आता रुपेरी पडद्यावर दिसणार आहे छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकतीच सुबोधने त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूकमध्ये सुबोध छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसत आहे. हर हर महादेव असे या चित्रपटाचे नाव आहे. केवळ मराठीतच नव्हे तर हिंदीसह दाक्षिणात्य भाषांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये सुबोध लिहितो, "छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतलं की आठवतं त्यांचं रूप, त्यांचा प्रताप आणि मनात डोकावून जातात त्यांच्या असाधारण शौर्यकथा... तो दरारा, तो रूबाब, त्यांची अखंड हिंदवी स्वराज्याची संकल्पना आणि ती सत्यात उतरवताना केलेल्या लढाया...येत्या दिवाळीत संपूर्ण भारतात घुमणार स्वराज्याचा महामंत्र, आपल्या शिवरायांची शिवगर्जना 'हर हर महादेव' ते ही पाच भाषांमध्ये."

झी स्टुडिओज् हा चित्रपट सादर करत असून अभिजीत देशपांडे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. येत्या दिवाळीत ही कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप चित्रपटाबद्दलचे इतर तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहेत. तेव्हा प्रेक्षकांना प्रतिक्षा आहे ती आता दिवाळीची.

बातम्या आणखी आहेत...