आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुबोधचा ट्विटरला रामराम:अभिनेता सुबोध भावेने घेतला ट्विटर अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय, हे आहे त्याचे शेवटचे ट्विट

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुबोध भावेने ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेने आपले ट्विटर अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतः ट्विट करत सुबोधने हे सांगितले आहे. मात्र अचानक त्याने निर्णय का घेतला, याचा उलगडा झालेला नाही.

‘आपल्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद. मी माझा ट्विटर अकाऊंट डिलीट करतो आहे. काळजी घ्या, मस्त राहा, जय महाराष्ट्र, जय हिंद’, असे त्याने शेवटचे ट्विट केले आहे.

सोशल मीडियावरील वाढत्या नकारात्मकतेमुळे सुबोधने हा निर्णय घेतला असावा, असे म्हटले जात आहे. मात्र त्याचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांना त्याचा हा निर्णय योग्य वाटत नाहीये.

सुबोधजी, कृपया मुळीच असे करू नका. चांगल्या माणसांची सगळीकडेच खूप आवश्यकता आहे. इथेही. कारण माहित नाही. पण ट्रोलिंग हे कारण असेल तर दुर्लक्ष करा, अशा प्रतिक्रिया त्याचे चाहते देत आहेत.

बातम्या आणखी आहेत...