आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपकमिंग:अभिनेता सुबोध भावे झाला निर्माता, छोट्या पडद्यावर घेऊन येतोय 'शुभमंगल ऑनलाईन'; सायली संजीव-सुयश टिळक ही जोडी येतेय भेटीला

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कलर्स मराठी वाहिनीवर ही मालिका सुरु होणार आहे.

लॉकडाऊननंतर एंटरटेन्मेंट इंडस्ट्री हळूहळू पुर्वपदावर येत आहे. सध्या छोट्या पडद्यावर नवनवीन मालिकांचे प्रोमोज झळकू लागले आहेत. तब्बल आठ ते नऊ नव्या मालिका विविध वाहिन्यांवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाल्या आहेत. आता अभिनेते सुबोध भावेदेखील नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सुबोध आता निर्माता झाला आहे आणि त्याची पहिली मालिका 'शुभमंगल ऑनलाईन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला आहे. कलर्स मराठी वाहिनीवर ही मालिका सुरु होणार आहे. सुबोध भावेच्या कान्हाज मॅजिक या निर्मिती संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे.

या मालिकेतून सायली संजीव आणि सुयश टिळक ही जोडी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सोबत अभिनेत्री सुकन्या मोने यांचीदेखील महत्त्वाची भूमिका या मालिकेत आहे. सध्या लग्न जुळविण्यासाठी ऑनलाइन मुले-मुली पाहण्याचा ट्रेंड निघाला आहे, त्यावरच आधारित ही मालिका असेल असे प्रोमो आणि मालिकेच्या शीर्षकावरुन दिसून येतंय.

अभिनेता सुबोध भावेने इंस्टाग्राम अकाउंटवर मालिकेचा प्रोमो शेअर करुन, "कान्हाज मॅजिक" या आमच्या निर्मिती संस्थेच्या पहिल्या वहिल्या दैनंदिन मालिकेचा पहिला प्रोमो तुम्हा सगळ्यांसमोर सादर करताना विलक्षण आनंद होतोय", असे म्हटले आहे.

तर मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे सायली संजीव आणि सुयश टिळक यांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा प्रोमो शेअर केला आहे. ''Digital युगात होती Video Call वरच साऱ्या भेटीगाठी, जुळतील का आता Online लग्नाच्याही गाठी? पाहा नवी गोष्ट'', अशी पोस्ट त्यांनी टाकली आहे.

दरम्यान सुबोध भावेने सोमवारीच त्याच्यासह त्याची पत्नी मंंजिरी आणि मोठा मुलगा कान्हा यांंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांंगितले आहे. आम्ही सगळे घरीच क्वारंंटाईन असून तज्ज्ञ डॉक्टरांंच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत आहोत, असे सुबोधने सांगितले आहे.