आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
छोट्या पडद्यावर ‘सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस’ हा धम्माल विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेता सुमीत राघवन छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. हिंदी चित्रपट, मालिका तसंच नाटकाच्या मंचावरून आजवर सुमीतने रसिकांची मनं काबीज केलीये. यापूर्वी मराठी टेलिव्हिजनवर सोहळ्यांचा सूत्रसंचालक म्हणूनही तो रसिकांच्या भेटीला आला होता. मात्र एखाद्या मराठी शोचा सलग सूत्रसंचालक म्हणून या शोद्वारे कार्यक्रमाची एक हाती धुरा सुमीत पहिल्यांदाच सांभाळणार असून त्याच्यातील संवेदनशील, गुणी, हजरजबाबी कलावंताचे विविध पैलू या शोमधून उलगडले जाणार आहेत.
कॉमेडीच्या या सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये मराठी रंगभूमी गाजवणारे अनेक दमदार अवलिया कलाकार या कार्यक्रमात हजेरी लावतील. आपल्या धमाल अभिनयाने हास्याची धुंवाधार आतषबाजी करण्याची. तर कधीकधी हसताहसता प्रेक्षकांच्या मनाला पाझर फोडण्याची ताकद या कलावंतांच्या अभिनयात आहे. प्रेक्षकांचे लाडके विनोदवीर म्हणजेच नंदकिशोर चौघुले, माधवी जुवेकर, रोहित माने, पूजा ठोंबरे, अभिजीत चव्हाण, शशिकांत केरकर, रोहित माने, पूजा ठोंबरे, प्रथमेश शिवलकर, शर्मेश बेतकर, 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेमधील तात्या अर्थात अक्षय टांक, मंदार मांडवकर, दिशा दानडे यांच्यासारख्या एकापेक्षा एक सरस आणि दमदार विनोदनिर्मिती करणाऱ्या नामांकित हास्यसम्राटांबरोबरच तितक्याच दमदार विनोदी संहिता लेखकांची दमदार खेळी रसिकांना या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे.
कार्यक्रमाविषयी बोलताना सुमीत राघवन म्हणाला की, “मी आणि माझ्याबरोबर काही खास अतरंगी कलाकार सुपरफास्ट कॉमेडी एक्स्प्रेस घेऊन येत आहोत. खूप उत्सुकता आहे मला कार्यक्रमाबद्दल, कारण याआधी मी काही पुरस्कार सोहळे वगळता मराठी टेलिव्हिजनवर तसं विशेष काम मी केलेलं नाही. हा माझा मराठीतला पहिलाच शो आहे. आशिष पाथरे जो या कार्यक्रमाचा सर्वेसर्वा आहे त्याने मला कार्यक्रमाची संकल्पना ऐकवली आणि मला ती फार आवडली. कुणाच्याही अभिनयाचे परीक्षण मला करायचे नाहीय. मला फक्त हरहुन्नरी विनोदवीरांच्या मैफलीत धम्माल करायची आहे, त्यांच्या हास्याच्या वारीत सामील व्हायचेय. मनोरंजनाची ही वारी रसिकांसाठीही तितकीच आनंदवारी करण्याचा आमचा आटोकाट प्रयत्न असणार आहे.'
या कार्यक्रमाची निर्मिती संहिता क्रिएशन्स करत असून आशिष पाथरे सारखा हरहुन्नरी कलावंत, रंगभूमीवर वावरणारा रंगकर्मी या शोचं लेखन, दिग्दर्शन सांभाळणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.