आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण:अभिनेते सुनील गोडबोलेंनी लढवली अनोखी युक्ती, कोरोनाच्या काळात अशी घेत आहेत स्वतःची काळजी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्यांनी योजेलेल्या युक्तीमुळे त्यांचे आरोग्य आणि शूटिंग ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण झाले.

मनोरंजन क्षेत्राला कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये अनेक संकटाना तोंड द्यावे लागले. अतिशय बिकट अटी सांभाळत वाहिन्या आणि निर्मिती संस्थानी शूटिंगला सुरुवात केली. मात्र कलाकारांसाठी कोरोनाच्या या भीतीयुक्त वातावरणात काम करणे खरच जोखमीचे होते. त्याचबरोबर रोजचा प्रवास करणे म्हणजे संसर्गाला आमंत्रण देणे. त्यात सरकारी नियमांप्रमाणे 65 वयाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना सेटवर येण्यास मनाई होती. मात्र 64 वय असलेल्या अप्पा केतकरांना म्हणजेच ज्येष्ठ अभिनेता सुनील गोडबोलेंना हा नियम लागू नव्हता. त्यामुळे त्यांनी एक युक्ती केली.

कितीही झालं तरी करोना काळात जेष्ठ नागरिकांनी स्वतः ची काळजी घेण महत्वाचे आहे. स्वतःच्या आरोग्याचे कारण देत अप्पांनी काम बंद केले असते तर प्रेक्षकांची निराशा झाली असते. कारण अप्पांची मालिकेमधील व्यक्तिरेखा खूप महत्वाची आहे. त्यामुळे झी युवा वरील ’ऑलमोस्ट सुफळसंपूर्ण’चे आवडते अप्पा सुनील गोडबोले यांनी यावर एक नामी युक्ती योजली.

अप्पांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या प्रेमासाठी एक मोठा निर्णय घेतला. आपल्या प्रेक्षक कुटुंबासाठी शूटिंग सुरु झाल्या दिवसापासून अप्पा स्वतःच्या कुटुंबापासून, घरापासून दूर राहत आहे. त्यांनी झी युवा वाहिनी शी बोलून शूटिंगच्या बंगल्यामध्येच स्वतःची राहण्याची व्यवस्था करून घेतली. झी युवा वाहिनी आणि सोहम प्रोडक्शननेसुद्धा त्यांना आराम मिळेल अशी व्यवस्था करुन दिली. आज 50 दिवसांहून अधिक काळापासून अप्पा असे राहत आहेत आणि त्यांनी योजेलेल्या युक्तीमुळे त्यांचे आरोग्य आणि शूटिंग ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण झाले.

बातम्या आणखी आहेत...