आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'MFK'चा सुवर्ण दशक सोहळा:'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?'ने दिल्या खूप चांगल्या आठवणी - स्वप्नील जोशी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्राचा फेवरेट कोण? सुवर्ण दशकचा नामांकन सोहळा 7 फेब्रुवारी रोजी झी टॉकीजवर प्रसारित होणार आहे.

रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या तारे-तारकांना दिला जाणारा मानाचा मुजरा म्हणजे ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सन्मान. असंख्य मतांचा कौल आपल्या लाडक्या कलावंतांवर बरसावणारा प्रेक्षक स्वतः महाराष्ट्राचा फेवरेट कलाकार आणि चित्रपट ठरवतो. ‘झी टॉकीज’ ची ही अभिनव संकल्पना मराठी सिनेसृष्टीत चांगलीच नावाजली गेली. हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकच नव्हे तर कलाकारांचा देखील तितकाच लाडका आणि आवडता आहे. महाराष्ट्राचा लोकप्रिय रोमँटिक हिरो स्वप्नील जोशी याने तमाम प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. प्रेक्षकांप्रमाणेच महाराष्ट्राचा फेवरेट कोण? हा पुरस्कार सोहळा स्वप्निलच्या देखील हृदयाच्या खूप जवळ आहे.

या सोहळ्याबद्दल बोलताना स्वप्नील म्हणाला, "महाराष्ट्राचा फेवरेट कोण? या पुरस्कार सोहळ्याने मला खूप चांगल्या आठवणी दिल्या आहेत. ज्यावर्षी दुनियादारी चित्रपटासाठी मला नामांकन मिळालं होतं त्यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने माझ्यावर प्रेमाचा अक्षरशः वर्षाव केला आणि मला महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता आणि महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन हे दोन्ही पुरस्कार मिळाले. खूप कमी वेळा असं होतं की हे दोन्ही पुरस्कार एकाच कलाकाराला मिळतात आणि ते मला मिळाले त्यामुळे तो खास क्षण महाराष्ट्राचा फेवरेट कोण?ने मला दिला असं मी म्हणेन."

महाराष्ट्राचा फेवरेट कोण? सुवर्णदशकचा नामांकन सोहळा 7 फेब्रुवारी रोजी झी टॉकीजवर प्रसारित होणार आहे. अभिनेता स्वप्नील जोशी आणि अमेय वाघ या कार्यक्रमात सुवर्णदशक सोहळ्याची नामांकनं जाहीर करणार असून गेल्या 10 वर्षातील महाराष्ट्राचा फेवरेट कोण?च्या विजेत्यांची चर्चा, गप्पागोष्टी आणि बरंच काही प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यावर्षीचा महाराष्ट्राचा फेवरेट कोण? हा दशकातला सर्वात मोठा आणि दिमाखदार पुरस्कार सोहळा असणार आहे. तसेच यंदा मागील दहा वर्षात महाराष्ट्राचा फेवरेट कोण? या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या विजेत्यांमधून महाराष्ट्राचा महाविजेता निवडण्याची जबाबदारी प्रेक्षकांवर असणार आहे.

महाराष्ट्राचा फेवरेट कोण?च्या सुवर्ण दशक सोहळ्याबद्दल बोलताना अभिनेता स्वप्नील जोशी म्हणाला. "महाराष्ट्राचा फेवरेट कोण? सुवर्णदशक सोहळा हा खूप वेगळा असणार आहे ज्यात नव्या प्रवासाची नंदी आहे. महाराष्ट्राचा फेवरेट कोण? हा नेहमीच कलाकारांइतकाच प्रेक्षकांचा सोहळा राहिला आहे कारण प्रेक्षक त्यांचे फेवरेट्स निवडतात. 2020 हे वर्ष कोणीच विसरू शकत नाही आणि त्यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातील प्रेक्षकांचा लाडका सोहळा त्यांच्या मनोरंजनासाठी येतोय. या सुवर्ण दशक सोहळ्याने फक्त मराठी इंडस्ट्रीत चैतन्य येणार नसून प्रेक्षक आणि सिनेसृष्टीचं नातं अजून दृढ होणार आहे. प्रेक्षक आणि सिनेसृष्टीला जवळ आणण्यात झी टॉकीज या वाहिनीचा खूप मोठा वाटा आहे. यंदा महाराष्ट्राचा फेवरेट कोण? हा सुवर्णदशक सोहळा असल्यामुळे स्पर्धा खूप टफ असणार आहे कारण मागील 10 वर्षातील विजेते नॉमिनेटेड आहेत त्यामुळे हा सोहळा खूपच दिमाखदार असणार आहे. मी खूपच उत्सुक आहे कि मी यंदा हा सोहळा एक सूत्रसंचालक म्हणून अजून जवळून अनुभवणार आहे."

बातम्या आणखी आहेत...