आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑफिशिअली एंगेज्ड:दुस-यांदा बोहल्यावर चढणार आहे अभिनेता विजय आंदळकर, भावी पत्नीसुद्धा आहे अभिनेत्री; 'या' मालिकेत दोघांनी केले होते एकत्र काम

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विजयचे पहिले लग्न अभिनेत्री पूजा पुरंदरेसोबत झाले होते.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय आंदळकर लवकरच दुस-यांदा बोहल्यावर चढणार आहे. अभिनेत्री रुपाली झंकारसोबत नुकताच विजयचा साखरपुडा झाला. रुपालीने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहे.

रुपालीने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहे. हे फोटो शेअर करत तिने, ‘पहली ही नज़र में कुछ हम कुछ तुम हो जाते हैं यूँ गुम, नैनों से बरसे रिमझिम रिमझिम हम पे प्यार का सावन, शर्म थोड़ी थोड़ी हम को आये तो नज़रे झुक जाये… सितम थोडा थोडा हम पे शोख हवा भी कर जाये..’ असे कॅप्शन दिले आहे.

  • मालिकेच्या सेटवर विजय-रुपालीचे सूत जुळले

विजयची भावी पत्नी रुपाली झंकार ही देखील अभिनेत्री आहे. तिने झी मराठी वाहिनीवरील ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू’ या मालिकेत काजल ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. याच मालिकेत विजयसुद्धा मुख्य भूमिकेत होता. या मालिकेच्या सेटवरच विजय आणि रुपाली यांचे सूत जुळले आणि आता हे दोघे लवकरच लग्नाच्या रेशीमगाठीत अडकणार आहेत.

  • अभिनेत्री पूजा पुरंदरेसोबत झाले होते विजयचे पहिले लग्न

विजय रुपालीसोबत दुसरे लग्न थाटतोय. त्याचे पहिले लग्न 2017 मध्ये अभिनेत्री पुजा पुरंदरेसोबत झाले होते. मात्र कमी कालावधीतच दोघांनी आपले मार्ग विभक्त केले. सध्या छोट्या पडद्यावर सुरु असलेल्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहे.

विजयने छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावरही काम केले आहे. ‘मी अँड मिसेस सदाचारी’, ‘ढोल ताशे’, ‘702 दिक्षित’ या चित्रपटांमध्ये तो झळकला आहे.

बातम्या आणखी आहेत...