आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्टार प्रवाहवर लवकरच भेटीला येणाऱ्या ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोजना देखील भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत युवराज ही व्यक्तिरेखा साकरणार आहे अभिनेता विजय आंदळकर. विजयला याआधी बऱ्याच मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षक भेटले आहेत. स्टार प्रवाहच्या 'गोठ' या मालिकेत त्याने खलनायक साकारला होता.
'पिंकीचा विजय असो' मालिकेतील युवराज साकारण्यासाठी तो खुपच उत्सुक आहे. या भूमिकेविषयी सांगताना विजय म्हणाला, ‘राजकारणातील मोठं प्रस्थ असणाऱ्या गजराज धोंडे पाटील यांचा युवराज हा मुलगा. वडिलोपार्जित सत्ता-संपत्ती यामुळे रॉयल कारभार आणि ऐदीपणा असलेला. आपल्याला फक्त मान पाहिजे, जान गेली तरी चालेल हे युवराजचं ब्रीदवाक्य आहे. मान मिळवण्यासाठी युवराज काहीही करु शकतो. मालिकांमध्ये राजकारण हा विषय फार क्वचित हाताळला जातो. त्यामुळे पिंकीचा विजय असो मालिकेतील युवराज हे पात्र साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान आहे.'
पुढे विजय सांगतो, 'सातारी भाषा शिकण्यासाठी मी बरीच मेहनत घेतोय. माझ्या सातारच्या मित्रांना मी आवर्जून फोन करतो आणि सातारी भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो. आमचं शूट साताऱ्यामध्ये सुरु असल्यामुळे आजुबाजूच्या दुकानदारांशीही बोलीभाषेत बोलतो. या भाषेत एक वेगळाच गोडवा आहे. साताऱ्यातलं वातावरण अतिशय सुंदर आहे. डोंगर दऱ्यांमध्ये आम्ही शूट करतोय. इथे कायमस्वरुपी रहाणारी लोकं नशिबवान आहेत असं मला वाटतं. शुद्ध हवा, घरगुती जेवण यामुळे मी शूटिंगचा मनापासून आनंद लुटतोय.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.