आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्ह:अभिनेता विनीत भोंडे झाला बाबा, पत्नी सोनमने दिला गोंडस मुलाला जन्म; म्हणाला - 'बाप्पा आणि स्वामींच्या कृपेने आज आम्हाला मोदक प्राप्त झाला आहे'

वैशाली करोले6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'माऊली' ठेवले आहे बाळाचे टोपणनाव

छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या', 'बिग बॉस मराठी' या कार्यक्रमांमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता विनीत भोंडे बाबा झाला आहे. त्याची पत्नी सोनमने आज एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात सकाळी दहा वाजता त्यांच्या बाळाचा जन्म झाला आहे. आई आणि बाळ दोघेही सुखरुप असून बाळाचे वजन तीन किलो असल्याचे विनीतने सांगितले आहे. या दाम्पत्याचे हे पहिलेच बाळ आहे.

'माऊली' ठेवले बाळाचे टोपणनाव
विनीत म्हणाला, बाप्पा आणि स्वामींच्या कृपेने आज आम्हाला मोदक प्राप्त झाला आहे. विनीत आणि त्याची पत्नी सोनम यांनी आपल्या बाळाचे टोपणनाव 'माऊली' ठेवले आहे. तर 'स्वामी' आणि 'मोरया' या दोनपैकी एक नाव अंतिम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मोरया आणि स्वामी यापैकी एक नाव बाळासाठी निश्चित केले जाणार आहे.
मोरया आणि स्वामी यापैकी एक नाव बाळासाठी निश्चित केले जाणार आहे.

मुळचा औरंगाबादचा आहे विनीत
विनीतचे कुटुंबीय मुळचे नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील आहे. पण गेल्या 45 वर्षांहून अधिक काळापासून त्याचे आईवडील औरंगाबाद येथे स्थायिक झाले आहेत. सुरुवातीला हे कुटुंब औरंगाबादच्या खडकेश्वर या भागात वास्तव्याला होते. पण 2008 डिसेंबरमध्ये विनीतच्या आईवडिलांनी वाळूज महानगर येथे मोठी वास्तू उभी केली. 'इंदिरानाथ' असे त्याच्या घराचे नाव आहे.

मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्रात विनीतने बी.ए. केले आहे. निशिकांत कामत यांच्या 'डोंबिवली फास्ट' या चित्रपटातून विनीतला पहिला मोठा ब्रेक मिळाला होता. 'लक्ष्य' या एकांकिकेतील त्याचा अभिनय बघून दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी त्याला 'डोंबिवली फास्ट' या चित्रपटात संधी दिली होती. येथूनच त्याच्या सिनेसृष्टीतील प्रवासाला सुरुवात झाली.

लवकरच विनीत ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणा-या 'मुक्कामपोस्ट कोळशेवाडी' या वेब सीरिजमध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये त्याच्यासोबत मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे हे कलाकारदेखील दिसणार आहेत.

विनीतच्या पत्नीचे झाले आहे बीएस्सी नर्सिंग
विनीत आणि सोनम यांचे 4 मार्च 2018 रोजी औरंगाबाद येथे लग्न झाले. सोनम ही मुळची सोलापूरची आहे. तिचे बीएस्सी नर्सिंग पुण्यात झाले असून आती ती रेल्वे हॉस्पिटलमध्ये भायखळा येथे कार्यरत आहे.

भावंडांमध्ये सर्वात लहान आहे विनीत..
विनीतच्या घरी त्याचे आईवडील, दोन भाऊ, वहिनी आणि पुतणे आहेत. विनीतला दोन थोरले भाऊ आहेत. विशाल आणि विपूल ही त्यांची नावे आहेत. थोरला भाऊ विशाल हा कंपनीत अकाउंटंट पदावर कार्यरत आहे, तर धाकटा भाऊ विपूल हा सीए आहे. विनीतच्या दोन्ही वहिनीही वर्किंग वुमन आहेत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या भोंडे कुटुंबात विनीत वाढला आहे.

बातम्या आणखी आहेत...