आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीव्ही अपडेट:'दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत होणार मोठ्या ज्योतिबाची एंट्री, भूमिकेसाठी अभिनेत्याने वाढवले 12 किलो वजन

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता विशाल निकम दिसणार मोठ्या ज्योतिबाच्या भूमिकेत

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिका आता अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. आतापर्यंत छोट्या ज्योतिबाचं मालिकेत दर्शन होत होतं. आता लवकरच मोठ्या ज्योतिबाची मालिकेत एंट्री होणार आहे. असुरांचा नाश करण्यासाठीच ज्योतिबा अवतारी रुपात येणार आहे. केदार विजय ग्रंथातील काही भागांना अनुसरुन कथा गुंफण्यात आल्यामुळे प्रेक्षकांना आता मालिकेच्या रुपात ज्योतिबाच्या भव्यदिव्य रुपाचं दर्शन घेता येणार आहे.

ज्योतिबाच्या या भव्यदिव्य रुपासोबतच यमाई आणि चोपडाई यांच्यादेखिल अवताराची गोष्ट मालिकेमध्ये उलगडणार आहे. त्यामुळे ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेचे यापुढील भाग भक्तीरसाने परिपूर्ण असे असतील.

12 किलो वाढवले वजन
अभिनेता विशाल निकम मोठ्या ज्योतिबाच्या भूमिकेत दिसणार असून या भूमिकेसाठी त्याने बरीच मेहनत घेतली आहे. ज्योतिबाच्या अनेक पौराणिक कथा वाचण्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट विशालने आत्मसात केली ती म्हणजे घोडेस्वारी. कमी कालावधीत विशाल घोडेस्वारी करायला शिकला आहे. यासोबतच विशालने या भूमिकेसाठी 12 किलो वजनही वाढवलं आहे. मुळचा सांगलीचा असल्यामुळे कोल्हापुरी भाषेचा लहेजा त्याला आपसुकच येत होता.

दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेच्या यापुढील प्रवासासाठी विशाल खुपच उत्सुक आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser