आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी झाली हो...:अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळीच्या घरी झाले चिमुकल्या पाहुणीचे आगमन, अरुण गवळी झाले आजोबा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • योगिता ही ‘डॅडी’ अर्थात गँगस्टर अरूण गवळी यांची मुलगी आहे.

अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांनी गेल्या वर्षी 8 मे रोजी लग्नगाठ बांधली होती. लग्नाला वर्ष होताच दोघांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. अक्षय आणि योगिताला कन्यारत्न प्राप्त झाला आहे. आज दुपारी त्यांनी ही गोड बातमी दिली. बाळाचा जन्म मुंबईतील दादर येथील नर्सिंग होम मध्ये झाला आहे. योगिता ही ‘डॅडी’ अर्थात गँगस्टर अरूण गवळी यांची मुलगी आहे. त्यामुळे अरूण गवळी आजोबा झाले आहेत.

बाबा झाल्यावर प्रतिक्रिया देताना अक्षयच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. या बाबत बोलताना तो म्हणाला, 'मला इतका आनंद झाला आहे की तो मी शब्दात मांडू शकता नाही. एक बाबा म्हणून मी माझा प्रवास सुरु करणार आहे आणि त्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. बाळ आणि योगिता दोघेही सुखरूप आहेत'.

यापुढे बोलताना तो म्हणाला की, 'आमच्या लग्नाला वर्ष पूर्ण होणार असतानाच या गोड बातमीने हा आनंद द्विगुणित झाला आहे. कुटुंबात नवीन सदस्य येणार असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. इतकेच नव्हे तर बाळाचे नाव काय ठेवणार अशा प्रश्नांनी भंडावून सोडले आहे'.

बातम्या आणखी आहेत...