आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यू एंट्री:‘रंग माझा वेगळा’ मालिकेत होणार आहे अभिनेत्री अभिज्ञा भावेची एंट्री, साकारणार आहे 'ही' व्यक्तिरेखा

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तनुजा भारद्वाज हे पात्र साकारताना अभिज्ञा दिसणार आहे.

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. लवकरच या मालिकेत अभिज्ञा भावेची एंट्री होणार आहे. तनुजा भारद्वाज असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून तनुजाच्या येण्याने कथानकातही नवं वळण येणार आहे. कार्तिक आणि तनुजा कॉलेज फ्रेण्ड्स. मात्र कॉलेजनंतर या दोघांची भेट कधी झाली नाही. आता मात्र एका अपघातानेच या दोघांची भेट घडवून आणली आहे. तनुजाच्या येण्याने मालिकेच्या कथानकात कोणता नवा ट्विस्ट येणार हे पहाणं देखील उत्सुकतेचं असणार आहे.

एकीकडे सौंदर्या काळ्या रंगाचा द्वेष का करते या गोष्टीचा छडा लावण्यासाठी दीपा कार्तिक जीवाचं रान करत आहेत. अशातच तनुजाच्या येण्याने हा गुंता वाढणार की सुटणार या प्रश्नांची उत्तरं रंग माझा वेगळाच्या पुढील भागांमधून लवकरच उलगडतील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser