आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एंगेज्ड:अभिनेत्री अभिज्ञा भावेचा झाला साखरपुडा, पुढील वर्षी दुस-यांदा चढणार बोहल्यावर; जाणून घ्या जोडीदाराविषयी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोघांनीही पुढील वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

'खुलता कळी खुलेना' आणि 'तुला पाहते रे' या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावेचा नुकताच साखरपुडा झाला. मेहुल पै हे तिच्या जोडीदाराचे नाव असून तो एक उद्योजक आहे. छोटेखानी समारंभात दोघांनी साखरपुडा केला. विशेष म्हणजे अभिज्ञा आणि मेहुल या दोघांचाही पहिला घटस्फोट झाला असून त्यांचे हे दुसरे लग्न आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोघांनीही पुढील वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिज्ञा आणि मेहुल यांच्या साखरपुड्याला जवळचे नातेवाईक उपस्थित होते.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिज्ञाने सांगितल्यानुसार, मेहुल आणि ती एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. 15 वर्षांपासून हे दोघे एकमेकांना ओळखतात. मात्र मध्यंतरीच्या काळात त्यांचा संपर्क तुटला होता. काही दिवसांनी हे दोघे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. दोघांचाही घटस्फोट झाल्याने काही मित्रमैत्रिणींनी दोघांना त्यांच्या नात्याचे रुपांतर लग्नात करण्याचा सल्ला दिला. नंतर दोघांनी मिळून लग्न करण्याचा निर्णय घेतला.

अभिज्ञा म्हणते, आम्हा दोघांनाही भूतकाळातील नात्यांमध्ये जो काही अनुभव आला, त्यानंतर मोठा समारंभ किंवा कार्यक्रम आम्हाला करायचा नव्हता. सध्या लग्नाची तारीख ठरवली नसून पुढील वर्षी लग्न करु.

2014 मध्ये अभिज्ञाचे वरुण वैटिकरसोबत लग्न झाले होते. मात्र या दोघांचे नाते फार काळ टिकले नाही. दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.