आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिज्ञाची लगीनघाई:अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या हातावर रचली मेहंदी, 7 जानेवारी रोजी अडकणार आहे लग्नाच्या बेडीत!

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नुकताच अभिज्ञाचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला.

'खुलता कळी खुलेना', 'तुला पाहते रे' आणि 'रंग माझा वेगळा' या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे हिच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. येत्या 7 जानेवारी रोजी बिझनेसमन मेहुल पैसोबत अभिज्ञा विवाहबद्ध होणार आहे. तत्पूर्वी तिचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाला अभिज्ञाच्या मित्रमंडळींनी हजेरी लावली होती. तेजस्विनी पंडीत, मयुरी देशमुख, श्रेया बुगडेसह मराठी इंडस्ट्रीतील बरेच कलाकार तिच्या मेहंदीच्या कार्यक्रमाला हजर होते.

ऑक्टोबर महिन्यात अभिज्ञा आणि मेहुल यांचा साखरपुडा झाला होता.

छोटेखानी समारंभात दोघांनी साखरपुडा केला. त्यांच्या साखरपुड्याला जवळचे नातेवाईक उपस्थित होते.

विशेष म्हणजे अभिज्ञा आणि मेहुल या दोघांचाही पहिला घटस्फोट झाला असून त्यांचे हे दुसरे लग्न आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिज्ञाने सांगितल्यानुसार, मेहुल आणि ती एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. 15 वर्षांपासून हे दोघे एकमेकांना ओळखतात.

मात्र मध्यंतरीच्या काळात त्यांचा संपर्क तुटला होता. काही दिवसांनी हे दोघे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले.

दोघांचाही घटस्फोट झाल्याने काही मित्रमैत्रिणींनी दोघांना त्यांच्या नात्याचे रुपांतर लग्नात करण्याचा सल्ला दिला. नंतर दोघांनी मिळून लग्न करण्याचा निर्णय घेतला.

2014 मध्ये अभिज्ञाचे वरुण वैटिकरसोबत लग्न झाले होते. मात्र या दोघांचे नाते फार काळ टिकले नाही. दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...