आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयाने खास नखांवर लिहून घेतली लग्नाची तारीख:'या' तारखेला हार्दिकसोबत होतेय विवाहबद्ध, करुन घेतले खास नेल आर्ट

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री अक्षया देवधर पुढच्या काही तासांत अभिनेता हार्दिक जोशीसोबत विवाहबद्ध होणार आहे. पण अद्याप अक्षयाच्या लग्नाची तारीख समोर आली नव्हती. आता अक्षयाने स्वतः तिच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे, पण ती देखील हटके अंदाजात...

झाले असे की, लग्नविधींना सुरूवात झाल्यानंतर अक्षया स्वतःच्या नटण्यावरही विशेष भर देतेय. लग्नासाठी तिने खास नेल आर्ट करुन घेतले आहे. आणि तिचे हे नेल आर्ट अतिशय वेगळे आहे. कारण तिने तिच्या नखांवर लग्नाची तारीख लिहून घेतली. 2.12.22 रोजी अक्षया हार्दिकसोबत विवाहबद्ध होणारेय. म्हणजेच उद्या दोघांचा विवाह पार पडणारेय. याशिवाय तिने नखांवर 'अहा' म्हणजेच अक्षयाचा 'अ' आणि हार्दिकमधील 'हा' ही अक्षरेही लिहून घेतली आहेत. अक्षया आणि हार्दिकच्या लग्नाचा हॅशटॅगदेखील 'अहा' हाच आहे. अक्षयाने या नेल आर्ट करुन घेतानाचा खास व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून अक्षया आणि हार्दिकचे चाहते त्यांच्या लग्नाची तारीख जाणून घेण्यास उत्सुक होते. आता उद्या पुण्यात दोघे शाही अंदाजात साता जन्माच्या गाठीत अडकणार आहे. तत्पूर्वी त्यांच्या मेंदी आणि हळदी सेरेमनीची फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

  • अक्षयाच्या हातावर सजली हार्दिकच्या नावाची मेंदी:नव-या मुलीने हातावर लिहिल्या सप्तपदी, बघा सेरेमनीची PHOTO आणि VIDEO

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमुळे घराघरांत पोहोचली अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. दरम्यान दोघांच्या घरीही लगीनघाई बघायला मिळतेय. बुधवारी अक्षयाच्या हातावर हार्दिकच्या नावाची मेंदी सजली तर नव-या मुलाला हळद लागली. आता अक्षयाच्या मेंदी सेरेमनीचे बरेच फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. वाचा सविस्तर..

  • आली समीप लग्नघटिका!:अक्षयाच्या हातावर सजली मेंदी, हार्दिक जोशीला लागली हळद; लग्नघरातील व्हिडिओ आले समोर

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली जोडी म्हणजे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर. हे दोघे आता ख-या आयुष्यात साता जन्माच्या गाठीत अडकणार आहेत. सध्या हार्दिक आणि अक्षया यांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. ग्रहमखपासून अक्षयाच्या घरी लग्नविधींना सुरूवात झाली. आता अक्षय आणि हार्दिकने त्यांच्या लग्नविधींचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...