आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनामुळे ओढावलेल्या संकटामुळे अनेकांना हालाखीच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिच्या चुलत काका आणि आत्यावरही आर्थिक संकट कोसळले आहे. याविषयी स्वतः भार्गवीने एक पोस्ट शेअर करत त्यांच्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे. तिचे काका पुण्यात रस्त्यावर कॅलेंडर आणि उदबत्या विकून आपला उदरनिर्वाह करत आहेत.
काकांची परिस्थिती सध्या हालाखीची आहे, पण आत्मनिर्भर असल्यामुळे ते कुटुंबीयांकडून मदत घेत नाहीत, अशी पोस्ट शेअर करुन भार्गवीने काकांसाठी मदतीचे आवाहन केले आहे.
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये काय म्हणाली भार्गवी?
“माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू…… हे आहेत श्री. चिरमुले आजोबा. कोरोनाने अनेकांचे कंबरडे मोडले त्यात यांचे देखील पण अनेकांनी शिकावी अशी यांची वयाच्या 81 तही असलेली जगण्याची जिद्द आणि लढाऊ वृत्ती… हे आजोबा आपल्या 65 वर्षीय मूक-बधिर बहिणीसोबत सदाशिव पेठेतील एका वाड्यात रहातात. उदरनिर्वाहासाठी दोघेही बँकांमधून शेव, फरसाण वगैरे पदार्थ विकतात आणि रोज संध्याकाळी सदाशिव पेठेत एका स्टूलावर सर्व पदार्थ मांडून विकण्याचा प्रयत्न करतात. पण कोरोना आला आणि सोबत यांच्या आयुष्यात घेऊन आला मोठ्ठे प्रश्नचिन्ह ??? बँका चालू होत्या, चालू आहेत. आजोबांची बँकेत जाऊन पदार्थ विकण्याची तयारीही आहे, पण बँकेतले कर्मचारी आजोबांना आता येऊ देत नाहीत, अर्थात स्वतःच्या आणि आजोबांच्या काळजीपोटी पण आता करायचे काय ? चिरमुले आज्जी- आजोबा या पदार्थांसोबत कधी उदबत्ती, कधी वाती ,कधी पंचांग विकायला आणतात. आता आजोबांनी कॅलेंडर विकायला ठेवली आहेत. आपल्या सर्वांना एक आवाहन आहे. कॅलेंडर तर आपण कोठून तरी घेणारच मग आपल्या नवीन वर्षाची सुरुवातच एका चांगल्या कामाने झाली तर ? आपण घ्या आणि आपल्या मित्रमंडळींना पण सांगा आपल्यासाठी असलेलं ‘कॅलेंडर’ कोणाच्यातरी जगण्याचा आधार बनू शकेल…”, अशी पोस्ट भार्गवीने शेअर केली आहे.
ती पुढे म्हणते, “हे माझे चुलत काका आणि आत्या आहेत. आम्ही सगळे कुटुंबीय कायम त्यांना मदत करतच असतो. पण, शेवटी आत्मनिर्भर स्वभाव आहे त्यांचा. त्यामुळे माझ्या पुण्यातल्या मित्र-मैत्रिणींना विनंती करते, तुमच्या परिने जी मदत होऊ शकेल, कॅलेंडर किंवा इतर वस्तू घेण्याच्या निमित्ताने तेवढी करा. मनापासून आभार”, असे भार्गवीने पोस्ट शेअर करत म्हटले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.