आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुणीतरी येणार येणार गं:अभिनेत्री धनश्री काडगावकर लवकरच होणार आहे आई, बेबी बंप दाखवतानाचे व्हिडिओ आणि फोटो केले शेअर

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लग्नाच्या जवळजवळ सात वर्षांनी धनश्री पहिल्यांदा आई होणार आहे.

छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच तिच्या घरी चिमुकल्याचे आगमन होणार आहे. 10 ऑक्टोबर रोजी एक खास व्हिडिओ शेअर करुन धनश्रीने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. विशेष म्हणजे याच दिवशी तिचे पती ध्रुवेश देशमुख यांचा वाढदिवस होता आणि आयुष्यातील ही खास गोष्ट सगळ्यांसोबत शेअर करण्यासाठी तिने या खास दिवसाची निवड केली.

या व्हिडिओत धनश्री तिच्या पतीसोबत गरोदरपणातील खास क्षणांचा आनंद घेताना दिसतेय. लग्नाच्या जवळजवळ सात वर्षांनी धनश्री पहिल्यांदा आई होणार आहे.

याशिवाय तिने ग्रीन आणि यलो कॉम्बिनेशन असलेल्या ड्रेसमधील बेबी बंप दाखवतानाचे फोटो शेअर केले आहेत.

धनश्री मुळची पुण्याची असून तिचे सासरसुद्धा पुण्यातच आहे. डिसेंबर 2013 मध्ये व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या ध्रुवेशसोबत धनश्रीचे लग्न झाले. दोघांचे हे अरेंज्ड मॅरेज आहे. ध्रुवेश धनश्रीपेक्षा वयाने चार वर्षांनी मोठा आहे. 10 ऑक्टोबर 1984 ही ध्रुवेशची तर 6 एप्रिल 1988 ही धनश्रीची जन्मतारीख आहे.

उच्चशिक्षित आहे धनश्री
धनश्रीचे शिक्षण पुण्यातच झाले. गरवारे कॉलेज ऑफ कामर्स येथून तिने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर IMCC येथून मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी प्राप्त केली.

अशी झाली छोट्या पडद्यावर धनश्रीची एंट्री
झी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या रिअॅलिटी शोमधून धनश्री घराघरांत पोहोचली. खरं तर या शोमध्ये सहभागी होण्याचा धनश्रीची विचार नव्हता. पण आईच्या आग्रहामुळे ती या शोमध्ये सहभागी झाली आणि 24 स्पर्धकांमध्ये तिची निवड झाली होती. आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर धनश्री या शोच्या टॉप 10 स्पर्धकांमध्ये पोहोचली. 'महाराष्ट्राचा सुपरस्टार'मुळे धनश्रीला 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती 'गंध फुलांचा गेला सांगून', 'जन्मगाठ' या मालिकांमध्ये झळकली. तर तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील नंदिता गायकवाडच्या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

रंगभूमीवर केले काम
'झोपी गेलेला जागा झाला' आणि 'आधी बसू मग बोलू' या नाटकांमधून धनश्रीने काम केले आहे.

मोठ्या पडद्यावर झाले धनश्रीचे पदार्पण
दासबाबू दिग्दर्शित 'ब्रेव्हहार्ट' या चित्रपटातून धनश्रीची मोठ्या पडद्यावर एन्ट्री झाली आहे. शिवाय तिचा 'चिठ्ठी' हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser