आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नवी भूमिका:अभिनेत्री ऋता दुर्गुळे सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत, 'सिंगिंग स्टार' कार्यक्रमाचं करणार सूत्रसंचालन

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेते प्रशांत दामले, गायक-संगीतकार सलील कुलकर्णी आणि गायिका बेला शेंडे या कार्यक्रमात परीक्षकाच्या खुर्चीत दिसणार आहेत.

ऋता दुर्गुळे हा मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहरा पहिल्यांदाच सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. आजपर्यंत ऋताने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, तिच्या दुर्वा आणि वैदेही या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे. तिचा स्वतःचा मोठा चाहता वर्ग आहे. सोनी मराठीच्या 'सिंगिंग स्टार' या एका ग्रँड कार्यक्रमात ती पहिल्यांदाच सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडताना तिला सर्व स्पर्धक आणि परीक्षक ह्यांच्याशी संवाद साधायची संधी मिळणार आहे. मालिका, नाटक आणि सिनेमा यांतून अभिनय करताना दिसणारी ऋता सूत्रसंचालनाचा नवा प्रयत्न करणार आहे. तिच्यासाठीदेखील हा अनुभव नवीन असणार आहे आणि या नव्या अनुभवासाठी तीदेखील उत्सुक आह

'गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे असे' म्हणत ऑगस्टपासून 'सिंगिंग स्टार' हा कार्यक्रम सुरू होणार आहे, अभिनेते-गायक प्रशांत दामले, गायक-संगीतकार सलील कुलकर्णी आणि गायिका बेला शेंडे या कार्यक्रमात परीक्षकाच्या खुर्चीत दिसणार आहेत. 'सिंगिंग स्टार' हा कार्यक्रम 21 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.