आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:अभिनेत्री इशा केसकरच्या वडिलांचे निधन, काही दिवसांपासून होते आजारी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

'जय मल्हार' आणि 'माझ्या नव-याची बायको' या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री इशा केसकरच्या वडिलांचे निधन झाले. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत इशाने याबद्दलची माहिती दिली. इशाचे वडील चैतन्य केसकर यांनी 24 नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. वडिलांचा फोटो व त्यासोबत त्यांची जन्मतारीख आणि निधनाची तारीख लिहित इशाने हा पोस्ट शेअर केला.

इशाच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, "वडिलांच्या निधनाने इशा पूर्णपणे खचली असून ती सध्या कोणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नाही. तिच्या वडिलांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बरी नव्हती आणि 24 नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन झाले."

वडिलांच्या पाठिंब्यामुळेच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल्याचे इशाने अनेक मुलाखतींमधून सांगितले आहे. 'जय मल्हार' मालिकेच्या ऑडिशनला जाताना बाबांनी एक प्रयत्न कर. आपणास हवे ते क्षेत्र आपली वाट पहात असतेच. अशी प्रेरणा दिली होती, असे ईशाने सांगितले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser