आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमवर सोमवारी मुंबईतील गोरेगाव परिसरात हल्ला झाला. या हल्ल्यात समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या पथकातील दोन अधिकारी जखमी झाले आहेत.
या हल्ल्यानंतर समीर वानखेडे यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या तब्येतीची माहिती दिली असून समीर यांची तब्येत ठिक असल्याचे तिने सांगितले आहे. क्रांतीने लिहिले, 'समीर हे ठिक आहेत. आम्ही त्यांच्यासोबत घरी आहोत. ड्रग्ज कनेक्शनच्या विरोधात उभे असलेल्या नार्कोटिक्स टीमला मोठा सॅल्युट. आम्हाला तुमच्यावर गर्व आहे.' सोबतच तिने त्यांच्याबद्दल विचारपूस करणाऱ्यांचेही आभार मानले आहेत.
60 जणांच्या टोळीने केला होता हल्ला
समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकावर जवळपास 60 जणांनी हल्ला चढवल्याची माहिती सूत्रांनी दिली. एनसीबीचे एक पथक ड्रग पॅडलर कॅरी मँडिसला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. या पथकाने छापा टाकताच कॅरीच्या सहका-यांनी एनसीबीच्या पथकावर दगड आणि काठीने हल्ला चढवला. मात्र, एनसीबीच्या पथकाने शौर्य दाखवत कॅरीचे सहकारी विपुल आगरे, युसुफ शेख आणि अमीन अब्दुल यांना अटक केली. अटक केलेल्या तीन आरोपींकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांची अनेक पथके या भागात छापा टाकत आहेत. आरोपींना भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 353 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.