आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीव्ही अपडेट:अभिनेत्री माधवी गोगटे पहिल्यांदाच झळकणार या मराठी मालिकेत, यापूर्वी अनेक हिंदी चित्रपट-मालिकांमध्ये केलंय काम

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या मालिकेचं शूटिंग नगरमध्ये चालू आहे.

'तुझं माझं जमतंय' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. सुरुवातीपासूनच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. अपूर्वा नेमळेकरने या मालिकेतून टीव्ही माध्यमात पुनरागमन केलं त्यामुळे तिला पुन्हा एकदा टीव्हीवर पाहायला मिळतंय याचा आनंद प्रेक्षकांना आहे. अपूर्वा सोबतच रोशन विचारे आणि मोनिका बागुल या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. या मालिकेचं शूटिंग नगरमध्ये चालू आहे.या मालिकेत दिसणारा अजून एक प्रमुख चेहरा म्हणजे अभिनेत्री माधवी गोगटे यांचा. माधवी या मालिकेत शुभांकाच्या आई म्हणजेच श्रीमती नगरकर यांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

माधवी यांना प्रेक्षकांनी याआधी अनेक हिंदी मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये पाहिलं आहे. पण तुझं माझं जमतंय ही त्यांची पहिलीच मराठी मालिका आहे. माधवी सारखी हरहुन्नरी कलाकार या मालिकेत आहे त्यामुळे या मालिकेची रंगात अजूनच वाढली आहे. या मालिकेत पम्मी आणि श्रीमती नगरकर यांची होणारी नोकझोक प्रेक्षक पाहणं एन्जॉय करतात आहे.

आपल्या व्यक्तिरेखेबद्दल आणि पहिल्याच मराठी मालिकेबद्दल बोलताना माधवी म्हणाल्या, "मी या आधी अनेक हिंदी मालिका केल्या आहेत त्यामुळे पहिल्यांदाच आपल्या मातृभाषेतील मालिका करताना मराठी कलाकारांमध्ये वावरताना मला खूप आनंद होतोय. मी तुझं माझं जमतंय या मालिकेत श्रीमती नगरकरची भूमिका निभावतेय. आमची संपूर्ण टीम नगरमध्ये शूटिंग करतेय त्यामुळे आम्ही इथे सर्वजण चित्रीकरणासोबतच खूप धमाल देखील करतोय."

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser