आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानसीची लगीनघाई:अभिनेत्री मानसी नाईकच्या लग्नविधींना सुरुवात, बघा ग्रहमख पूजेची खास छायाचित्रे

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मानसीच्या चाहत्यांना आता तिच्या लग्नाचे वेध लागले आहे.

मराठी सिनेसृष्टीत सध्या सनई चौघड्यांचे सूर ऐकू येत आहेत. अभिज्ञा भावे, आशुतोष कुलकर्णीनंतर आता अभिनेत्री मानसी नाईक लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. सध्या तिच्या घरी लगीन घाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतीच तिच्या घरी ग्रहमख पूजाही केली गेली. या विधीपासूनच तिच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे.

मानसीने ग्रहमख पूजेची छायाचित्रे आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केली आहेत. यात ती निळ्या रंगाच्या साडीत अतिशय सुंदर दिसतेय.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मानसीचा साखरपुडा पार पडला होता. सोशल मीडियावर फोटो शेअर करत मानसीनं तिच्या चाहत्यांसोबत ही खास गोष्ट शेअर केली होती. प्रदीप खरेरा हे मानसीच्या होणा-या नव-याचे नाव आहे. साखरपुड्याचा फोटो शेअर करुन 'एंगेज्ड... भावी मिसेस खरेरा' असे कॅप्शन मानसीने दिले होते.

कोण आहे प्रदीप खरेरा?
मानसीने याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रदीप खरेरासोबतचा फोटो शेअर करुन रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला होता. प्रदीप खरेरा हा आंतरराष्ट्रीय बॉक्सर असून त्याने अनेक नावाजलेल्या स्पर्धा जिंकल्या आहेत. एवढेच नाही तर मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेट्स 2018 चा तो विजेता आहे. याशिवाय तो मॉडेल आणि अभिनेताही आहे. मानसी नाईकप्रमाणेच प्रदीप खरेराही सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो आपले व्यायामाचे आणि मॉडेलिंगचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. प्रदीप खरेराचं इन्स्टाग्राम अकाउंट व्हेरीफाइड असून इन्स्टावर त्याचे जवळजवळ 82 हजार फॉलोवर्स आहेत.

बातम्या आणखी आहेत...