आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जस्ट मॅरिड:अभिनेत्री मानसी नाईक अडकली लग्नाच्या बेडीत, आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरासोबत झाली विवाहबद्ध

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोजक्या मित्र-मैत्रिणी व कुटुंबीयांच्या उपस्थितीत मानसीचा विवाहसोहळा पार पडला.

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक आज लग्नाच्या बेडीत अडकली आहे. तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत मानसी विवाहबद्ध झाली.

कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेत काही मोजक्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत मानसीचा विवाहसोहळा पार पडला.

अभिनेत्री दिपाली सय्यद, रेशम टिपणीस यांच्यासह काही कलाकारांनीही मानसीच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली. सोमवारी मानसीचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला होता. त्याचेही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.

रविवारी ग्रहमख पूजा विधीपासूनच तिच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली होती. मानसीने ग्रहमख पूजेची छायाचित्रे आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केली होती. यात ती निळ्या रंगाच्या साडीत अतिशय सुंदर दिसली.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मानसीचा साखरपुडा पार पडला होता. सोशल मीडियावर फोटो शेअर करत मानसीनं तिच्या चाहत्यांसोबत ही खास गोष्ट शेअर केली होती. प्रदीप खरेरा हे मानसीच्या होणा-या नव-याचे नाव आहे. साखरपुड्याचा फोटो शेअर करुन 'एंगेज्ड... भावी मिसेस खरेरा' असे कॅप्शन मानसीने दिले होते.

कोण आहे प्रदीप खरेरा?

मानसीने याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रदीप खरेरासोबतचा फोटो शेअर करुन रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला होता. प्रदीप खरेरा हा आंतरराष्ट्रीय बॉक्सर असून त्याने अनेक नावाजलेल्या स्पर्धा जिंकल्या आहेत. एवढेच नाही तर मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेट्स 2018 चा तो विजेता आहे. याशिवाय तो मॉडेल आणि अभिनेताही आहे. मानसी नाईकप्रमाणेच प्रदीप खरेराही सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो आपले व्यायामाचे आणि मॉडेलिंगचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. प्रदीप खरेराचं इन्स्टाग्राम अकाउंट व्हेरीफाइड असून इन्स्टावर त्याचे जवळजवळ 82 हजार फॉलोवर्स आहेत.

बातम्या आणखी आहेत...