आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा उन्हाळ्यात गरमी वाढणार!:अभिनेत्री मोनालिसा बागल देणार 'करंट', जाणून घ्या ही भानगड आहे तरी काय

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुप जगदाळे दिग्दर्शित 'करंट' हा चित्रपट 21 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'झाला बोभाटा' आणि आगामी 'भिरकीट' या चित्रपटांचे दिग्दर्शक अनुप जगदाळे नवा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव आहे 'करंट'. अभिनेत्री मोनालिसा बागलची या चित्रपटात प्रमुख भूमिका असून हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजे 21 मे 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे.

रेहा फिल्म प्रॉडक्शनच्या दीक्षा युवराज सुरवाडे यांनी 'करंट' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे सादर करण्यात आले. यंदा उन्हाळ्यात गरमी वाढणार अशी टॅगलाईन या टीजर पोस्टरवर आहे. त्यामुळे हा चित्रपट 'हॉट' असण्याचा अंदाज बांधता येतो. चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांची आहे. 'झाला बोभाटा' हा पुरेपूर मनोरंजन करणारा चित्रपट होता. त्यामुळे 'करंट' या चित्रपटातूनही प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानीच मिळेल यात शंका नाही.

सिनेमा करताना आम्ही दोनच नियम पाळतो, आमचा सिनेमा मनोरंजन करणारा असतो आणि पहिला नियम मी कधीच विसरत नसतो असे दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी सांगितले. चित्रपटातील स्टारकास्ट आणि अन्य तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...