आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीव्ही अपडेट:थुकरटवाडीमध्ये झाली मोनालिसा बागलची एन्ट्री, 'चला हवा येऊ द्या- लेडीज जिंदाबाद'च्या मंचावरून करणार प्रेक्षकांचे मनोरंजन

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता मोनालिसा एका नवीन मंचावर दिसणार आहे.

प्रेक्षक म्हणून कलाकाराला नवनव्या माध्यमातून पाहणे जणू ही त्यांच्यासाठी मनोरंजनाची मेजवानीच. कलाकार हा सर्वगुणसंपन्न असतो, म्हणजे त्यांच्यामध्ये कोणत्याही जॉनरचा अभिनय उत्तम करण्याची कला असते. त्यांच्यासाठी मुख्य ध्येय असतं 'प्रेक्षकांचे मनोरंजन'. हेच ध्येय फॉलो करत, स्वतःकडून कायम कसं बेस्ट दिलं जाईल याकडे लक्ष देणारी अभिनेत्री जिने मराठी सिनेृष्टीत एंट्री घेतल्यावर अनेकांना तिच्या सौंदर्यतेवर, अभिनय कौशल्यावर प्रेम करायला भाग पाडले आणि ती व्यक्ती म्हणजे अभिनेत्री मोनालिसा बागल.

'प्रेम संकट', 'झाला बोभाटा', 'परफ्यूम', 'ड्राय डे' या सिनेमांतून मोनालिसाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'टोटल हुबलाक' या मालिकेत तिने प्रमुख भूमिका साकारली होती. आता मोनालिसा एका नवीन मंचावर दिसणार आहे.

"कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे' असं हक्काने विचारणाऱ्या थुकरटवाडीत हास्याचा तुफान येणार आहे. कारण झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे नवीन पर्व सुरू झाले आहे, ज्याचे नाव आहे 'लेडीज जिंदाबाद'. या नवीन पर्वात अनेक मराठी अभिनेत्री स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत आणि त्यापैकी एक स्पर्धक मोनालिसा आहे. थुकरटवाडीतील अतरंगी आणि विनोदी कलाकारांच्या सोबतीने संपूर्ण महाराष्ट्रातील जनेतला हसवण्यासाठी ती आता सज्ज झाली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser