आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मराठी चित्रपटसृष्टीतील गोड चेहऱ्याची अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्या लग्नाचा आज चौथा वाढदिवस आहे. 3 डिसेंबर 2016 रोजी व्यावसायिक स्वप्निल राव याच्याशी मृण्मयी विवाहबद्ध झाली होती. सध्या मृण्मयी आणि स्वप्नील गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहेत. लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मृण्मयीने स्वप्नीलसोबतचा एक खास फोटो शेअर करुन नव-याला प्रेमळ शुभेच्छा दिल्या आहेत. तिने फोटोला कॅप्शन दिले, ''I love you Rao... 4!! @swapnilrao11 #anniversary''
पेशवाई थाटात झाला होता विवाहसोहळा
मृण्मयी आणि स्वप्निल यांच्या लग्नाचा सोहळा हा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. पेशवाई थाटात दोघे लग्नाच्या बेडीत अडकले होते. त्यांच्या लग्नापूर्वी मेंदी आणि संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती.
मृण्मयी-स्वप्नीलचे आहे अरेंज्ड मॅरेज
ग्लॅमर इंड्स्ट्रीमध्ये अनेकदा हिरो हिरोईन एकत्र काम करत असले की, त्यांचे एकमेकांवर प्रेम जडते आणि त्यांचे लग्न झालेले पाहाला मिळते. मृण्मयी आणि स्वप्निल यांनी मात्र अरेंज्ड मॅरेज केले.
आता अरेंज्ड मॅरेजमध्ये लव्ह स्टोरी नसते असे कोणी सांगितले... मृण्मयी आणि स्वप्निल यांचीही अशीच एक खास स्टोरी आहे. आपण दोघे एकमेकांसाठी बनलेलो आहोत ही जाणीव त्या दोघांनी झाली आणि सुरू झाली त्यांची लव्ह स्टोरी. पण तो क्षण नेमका कसा होता, हे त्या दोघांनीच लग्नाच्या एका खास व्हिडिओत सांगितले होते. या दोघांनी त्यांच्या भेटण्याची एकमेकांना पसंत करण्याची संपूर्ण स्टोरी शेयर केली होती.
अशी आहे दोघांची लव्हस्टोरी
पी 16 व्हिडिओच्या यू ट्यूब चॅनलवर स्वप्नील आणि मृण्मयीच्या लग्नाचा व्हिडिओ आहे. त्यात दोघांनीही त्यांचे लग्न ठरले, याविषयी सांगितले आहे. एक दिवस स्वप्निल घरात होता, त्यावेळी त्याचे वडील एकदम आनंदाने त्याच्याकडे आले आणि त्याला म्हणाले आपल्याला आपल्याला स्वप्नातली सून मिळाली आहे. स्वप्निलचे वडील फारच एक्साईटेड होते. ती फारच सुंदर आहे, ती फार चांगल्या कुटुंबातील आहे तू तिला एकदा भेटायलाच पाहिजे असे त्यांनी सांगितले. स्वप्निलनेही एकदा भेटायला काय हरकत आहे असा विचार करत होकार दिला आणि त्यांनी एकमेंकांचे नंबर घेतले आणि एकमेकांशी बोलले. काही दिवस फोनवलर बोलल्यानंतर स्वप्निल आणि मृण्मयी यांनी भेटायचे ठरवले.
भेटायचे ठरले त्यादिवशी मृण्मयी महेश मांजरेकर यांचे शूट करत होती. ते तिला पॅकअपचा वेळ सांगत होते आणि तोच वेळ ती स्वप्निलला फोनवर सांगत होती. शूट लांबत चालले होते आणि मृण्मयीच्या पॅकअपची वेळ सारखी बदलत होती. त्यामुळे ती फोनवर स्वप्निलला वेळ बदलून सांगत होती. सारखी वेळ बदलत असल्याने त्यांनी अखेर आता भेटायला नको असे ठरवले. पण तेवढ्यात महेश मांजरेकर यांनी मृण्मयीला पॅकअप झाल्याचे सांगितले. पॅकअपचे समजल्यानंतर मृण्मयीने त्याला फोन केला आणि सांगितले की मला लेट होत आहे, तोपर्यंत तू 302 मधून किल्ली घे आणि घरी जाऊन बस मी येते तोवर.
स्वप्निल मृण्मयीला म्हणाला, आपण अजून भेटलेलो नाही. पहिल्यांदाच भेटतोय, मी त्यांना काय म्हणून किल्ली मागू. त्यामुळे मी खालीच टाईमपास करतो. पाच मिनिटाने त्याने मृण्मयीला पुन्हा फोन केला आणि खाली काहीच नाही मी वर जाऊन बसतो असे सांगितले. मृण्मयी घरी आली आणि स्वप्निलने तिच्यासाठी दार उघडले. त्याने तिला वेलकम केले. आपण दोघे लग्न करणार आहोत हे स्वप्निल आणि मृण्मयीला पुढच्या पाच सेकंदातच कळले होते, असे त्यांचे म्हणणे आहे.
कधी कधी पहिल्यांदा भेटल्यानंतरही आपण किती वर्षांपासून भेटत आहोत असे वाटत असते. अशीच काहीशी फिलिंग स्वप्निलला मृण्मयीला भेटल्यानंतर आली होती. ती अगदी आपल्यासारखीच आहे, हेही स्वप्निलला लगेच जाणवले होते. लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात अशा गोष्टींवर विश्वास नव्हता. पण स्वप्निलला पाहिल्यानंतर लग्न, घर, सुख काय असतं हे समजलं असे मृण्मयी म्हणते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.