आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुड न्यूज:अभिनेत्री मृणाल दुसानीसच्या घरी झाले चिमुकलीचे आगमन, फोटो शेअर करत सांगितले लेकीचे नाव

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृणाल म्हणाली - आमच्या छोट्या परीचे आगमन झाले आहे..!

'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मृणाल दुसानीस हिने तिच्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. मृणाल नुकतीच आई झाली असून तिच्या घरी एका गोंडस मुलीचे आगमन झाले आहे. 24 मार्च रोजी मृणालने मुलीला जन्म दिला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आपल्या लेकीचे नावदेखील चाहत्यांना सांगितले आहे.

मृणालने एक खास फोटो शेअर करत लिहिले, "बाबांची चिमुकली आणि आईचं संपूर्ण जग..!!! आमच्या छोट्या परीचे आगमन झाले आहे..!! 👸 नूरवी.. 24.03.2022" असे कॅप्शन तिने दिले आहे. मृणालने शेअर केलेल्या फोटोत तिच्या मुलीचा चेहरा दिसत नाहीये.

यापूर्वी मृणालने 5 फेब्रुवारी रोजी एक पोस्ट शेअर करत ती आई होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली होती.

मृणालने छोट्या पडद्यापासून ब्रेक घेतला असून ती आता मातृत्वाचा आनंद घेतेय. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी यावर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...