आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा जुळून येती रेशीमगाठी:जुळून येणार नव्हत्या गाठी, या कारणामुळे प्राजक्ता माळी स्वीकारणार नव्हती ही मालिका

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्राजक्ताने साकारलेली मेघना ही व्यक्तिरेखा आजही सगळ्यांच्या आठवणीत आहे.
Advertisement
Advertisement

आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकताच एक गौप्यस्फोट केला आहे. एकेकाळी अत्यंत लोकप्रिय झालेली आणि आजही सगळ्यांच्या आवडीची असणारी 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका प्राजक्ता स्वीकारणार नव्हती. हिंदी मालिकेत काम करण्याची तिची खूप इच्छा होती. त्यामुळे उत्तम कथानक असूनही, ही मालिका न स्वीकारण्याचा तिचा विचार होता. मात्र, झी सोबतकाम करायचे आहे, हे कळल्यावर तिच्या आईने, तिला मालिका स्वीकारायला सांगितली. प्राजक्ताने साकारलेली मेघना ही व्यक्तिरेखा आजही सगळ्यांच्या आठवणीत आहे.

'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेचे पुनर्प्रक्षेपण सुरु झाल्यानंतर प्राजक्ता माळी हिला अनेक चाहत्यांचे फोन आल्याचे ती सांगते. या मालिकेच्या पुनर्प्रक्षेपणाबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणाली, "हिंदी मालिकेत काम करायचं असं मी मनाशी ठरवलं होतं. त्यामुळे 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका न स्वीकारण्याचा निर्णय मी घेणार होते. मात्र, झी सोबतकाम करायचं असल्याने, या मालिकेत काम करायची संधी सोडू नये असं मला आईने सांगितलं. आज मागे वळून पाहताना मी स्वतःला भाग्यवान समजते. अर्थात, या मालिकेत मी काम केलेलं नसतं, तरीही ती माझी सगळ्यात आवडती मालिका असती. ही एक उत्कृष्ट मालिका आहे. सध्याच्या काळात, ही मालिका पुन्हा पाहायला मिळत आहे, त्यामुळे सर्वच चाहते खुश आहेत. एक सकारात्मक संदेश, वेगळा विषय आणि मन प्रसन्न करणारी ही मालिका सगळेजण पुन्हा एकदा पाहतील, याची खात्री आहे." या मालिकेमुळेच प्राजक्ताला नवी ओळख मिळाली. आदित्य आणि मेघनाची गोड प्रेमकहाणी, आता 'झीयुवा' वाहिनीवर पाहायला मिळत आहे. 27 जुलैपासून, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता ही मालिका बघता येणार आहे. ही मालिका पुन्हा बघायला मिळत असल्याने, सारीच चाहते मंडळी खूप खुश आहेत. त्याचप्रमाणे, मालिकेचे पुनर्प्रक्षेपण होत आहे, म्हणून सर्वच कलाकार मंडळी सुद्धा खूपच आनंदी आहेत.

Advertisement
0