आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'तुझं माझं जमतंय' या मालिकेत नुकतीच अभिनेत्री प्रतिक्षा जाधवची एन्ट्री झाली आहे. या मालिकेत ती पम्मीची भूमिका साकारतेय. ही भूमिका सुरुवातीला अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर साकारत होती. मात्र अर्ध्यावरच तिने ही मालिका सोडली. आता तिच्याजागी प्रतिक्षा पम्मीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यापूर्वी प्रेक्षकांनी प्रतिक्षाला देव माणूस या मालिकेत मंजुळाच्या भूमिकेत पाहिलं आहे. तिची ही भूमिकादेखील खूप गाजली होती. प्रतिक्षाच्या लोकप्रियतेमुळे मालिकेतील तिच्या एंट्रीसाठी प्रेक्षक सुद्धा उत्सुक होते. तिच्या या नवीन भूमिकेबद्दल प्रतिक्षा सोबत साधलेला हा खास संवाद -
एक कलाकार म्हणून एक वेगळी भूमिका माझ्या वाट्याला आली. कुठल्याही कलाकाराला वेगवेगळ्या भूमिका साकारायला आवडतात, तसंच मला देखील पम्मीची भूमिका साकारायला मिळाली याचा मला आनंद आहे. दडपण सुरुवातीला थोडं फार होतं पण मला खूप काही शिकायला मिळतंय. मंजू या माझ्या व्यक्तिरेखेनंतर माझ्यावर विश्वास ठेवून मला पम्मीची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला दिली यासाठी मी झी परिवाराची आभारी आहे.
माझ्यासाठी काम हे दैवत आहे त्यामुळे या भूमिकेसाठी जेव्हा मला विचारण्यात आलं तेव्हा मला खूप आनंद झाला आणि खूप सकारात्मक वाटलं. मला मिळालेलं काम हे मी खूप सकारात्मकतेने स्वीकारते तशीच ही पम्मीची भूमिका देखील मी पूर्णपणे सकारात्मकतेने स्वीकारली.
ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठीची माझी तयारी अजूनही चालूच आहे. मला हळू हळू या भूमिकेचे पैलू उलगडत आहेत. मी याआधी साकारलेल्या भूमिका या साध्या होत्या पण पम्मीच्या भूमिकेत थोडासा मॅडनेस आहे, प्रत्येक डायलॉग डिलिव्हर करताना तिची एनर्जी लेव्हल खूप हाय आहे. त्यामुळे पम्मी साकारणं थोडं आव्हानात्मक आहे पण मला खात्री आहे की मी हे चांगल्या प्रकारे करू शकते. या भूमिकेच्या अभ्यासासाठी मी बॉलिवूड चित्रपटातील करीना कपूर, राणी मुखर्जी या अभिनेत्रींचे व्हिडिओज बघतेय आणि मी कशाप्रकारे अजून चांगलं करू शकते याकडे लक्ष देतेय.
पम्मीची भूमिका साकारणं आव्हानात्मक आहेच पण ती एक जबाबदारी देखील आहे. कारण अपूर्वाने या व्यक्तिरेखेला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे आणि आता इथून पुढे ती मला साकारायची आहे. तर ती जबाबदारी खूप मोठी आहे असं मी म्हणेन. पण नेहमीपेक्षा मला काहीतरी वेगळं करायला मिळतंय याचा आनंद देखील आहे.
सेटवरती सगळे माझे सहकलाकार आणि टीम खूप प्रेमळ आहे. आम्ही घरापासून लांब नगरमध्ये शूटिंग करतोय पण या मालिकेची संपूर्ण टीम ही आता कुटुंबाचा भागच झाली आहे. सेटवरती आम्ही कामासोबत खूप धमाल देखील करतो. माझे सहकलाकार आणि टीम ही खूप सपोर्टिव्ह आहे. मी नवीन असल्यामुळे माझ्यावर संपूर्ण टीम खूप मेहनत घेतेय त्यामुळे त्यांचे मी आभार मानेन.
मला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. मंजूच्या व्यक्तिरेखेसाठी मला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं. माझा पम्मी म्हणून प्रवास नुकताच सुरु झालाय पण या प्रवासाच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मला मिळतंय. त्यांच्या शुभेच्छा आणि प्रतिक्रिया रोज माझ्यापर्यंत पोहोचत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.