आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेने अलीकडेच 350 भागांचा यशस्वी ठप्पा गाठला आहे. सई आणि नचिकेत यांच्या प्रेमामधली लपवाछपवी बघताना प्रेक्षकांनाही मजा येतेय त्यात अप्पांची लुडबूड या मजेमध्ये भरच पाडतेय.
आता या मालिकेत एक नवीन व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, ती म्हणजे नचिकेतची आई इरा देशपांडे. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी एका नवीन सुप्रसिद्ध अभिनेत्रीची मालिकेत एन्ट्री होणार आहे. ती म्हणजे प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रिया मराठे. पुण्यात लहानाची मोठी झालेली इरा लग्न करून ऑस्ट्रेलियाला गेली आणि गेली 25 वर्षे ती तिकडेच राहतेय. नचिकेतवर 10 लाखांचं कर्ज आहे, त्यामुळे त्याला मदत करण्यासाठी ती इकडे आली आहे. ती विचाराने अगदी मॉडर्न आहे आणि भारतात अजूनही खूप लोक आहेत जे अजूनही अपडेट झालेले नसून खूप जुन्या विचारांचे आहेत असं तिचं मत आहे. त्यामुळे नचिकेत जेव्हा एका भारतीय मुलीच्या प्रेमात पडला आहे हे कळल्यावर तिची काय प्रतिक्रिया असेल हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.
या नव्या भूमिकेबद्दल बोलताना प्रिया म्हणाली, "ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेत एक वेगळी भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. मी या आधी कधीच NRI ची भूमिका निभावली नव्हती त्यामुळे मी खूप एन्जॉय करतेय आणि प्रेक्षकांना देखील माझी हू नवीन भूमिका बघायला नक्की आवडेल अशी मी आशा करते."
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.