आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी मालिका:अभिनेत्री सायली देवधर दिसणार रामभक्त वैदेहीच्या भूमिकेत, नवी मालिका 'वैदेही' - शतजन्माचे आपुले नाते लवकरच

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या मालिकेत अभिनेत्री पल्लवी अजय पाटील आणि तृष्णा चंद्रात्रे यासुद्धा दिसणार आहेत.

सोनी मराठी वाहिनीवर लवकरच 'वैदेही' - शतजन्माचे आपुले नाते, ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री सायली देवधर मुख्य भूमिका साकारत आहे. देव दिखाव्याला नाही श्रद्धेला पावतो, असे सांगणार्‍या या मालिकेत वैदेही ही रामाची निस्सीम भक्त आहे. तिच्या चांगल्या स्वभावामुळे ती दुसऱ्यांना नेहमी मदत करत असते. सालस आणि समंजस स्वभावाची वैदेही आपल्या कुटुंबासाठी, आपल्या बहिणींसाठी नेहमी खंबीर उभी आहे आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी संभाळतेय.

या मालिकेत अभिनेत्री पल्लवी अजय पाटील आणि तृष्णा चंद्रात्रे यासुद्धा दिसणार आहेत.

'वैदेही' - शतजन्माचे आपुले नाते ही मालिका 16 ऑगस्टपासून सोम ते शनि संध्या 7:30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीया येत आहे.

बातम्या आणखी आहेत...